अमेरिका आणि जपान यांच्यासह ऑस्ट्रेलियाही मलबार नौदल कवायतींमध्ये सहभागी होणार असल्याची घोषणा भारताने केली असून त्याची आम्ही दखल घेतली आहे, असे चीनने मंगळवारी स्पष्ट केले आणि लष्करी सहकार्य प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यासाठी पोषक असावे असे अधोरेखित केले.

ऑस्ट्रेलिया मलबार कवायतींमध्ये सहभागी होणार असल्याचे सोमवारी भारताने जाहीर केले, त्याचा अर्थ ‘क्वाड’मधील सर्व सदस्य देश कवायतींमध्ये सहभागी होणार आहेत. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात पुढील महिन्यात या कवायती होणार आहेत. ‘या नव्या घडामोडीची आम्ही दखल घेतली आहे’, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांनी सांगितले.