Philippines China Row Over Taiwan Issue: फिलिपिन्सच्या सुरक्षा सचिवांनी चीनच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. आमच्या देशाचे राष्ट्रपती फर्डिनांडो मार्को ज्युनिअर यांचा आणि आमच्या देशाचा अपमान केल्यानंतर ही प्रतिक्रिया आली आहे. चीनने गटारगंगेप्रमाणे बोलणं सोडलं पाहिजे अशा तिखट शब्दात फिलिपिन्सने चीनला सुनावलं आहे.

बुधवारी फिलिपिन्सने काढलं पत्रक

बुधवारी फिलिपिन्सने एक पत्रक काढलं आहे. यामध्ये सुरक्षा सचिव गिल्बर्ट टियोडोरो यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने आणि त्यांच्या प्रवक्त्यांनी आमच्या देशाचा आणि राष्ट्रपतींचा अपमान केल्याचं म्हटलं आहे. त्यासाठी त्यांनी गटारगंगेची पातळी गाठली आहे असंही म्हटलं आहे.

वाद सुरु कसा झाला?

मंगळवारी फिलिपिन्सने राष्ट्रपती मारकोस यांनी तैवानचे नवनिर्वाचित राष्ट्रपती लाई चिंग ते यांना निवडणुकीत यश मिळवल्याबद्दल शुभेच्छा देणारा संदेश धाडला होता. चीन कायमच तैवानवर अधिकार असल्याचं दर्शवतो. मात्र हे राष्ट्रपती चीनच्या विरोधात आहेत. त्यामुळे चीनने या शुभेच्छा संदेशावर प्रतिक्रिया दिली आणि मनीलाने (फिलिपिन्सची राजधानी) आगीशी खेळ करु नये असं म्हटलं होतं. त्यानंतर चीन आणि फिलिपाइन्स या दोन्ही देशांमधला तणाव वाढला आहे. फिलिपाइन्सने तैवानला जो शुभेच्छा संदेश पाठवला त्यानंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालायनेही नाराजी व्यक्त केली. फिलिपिन्सने पाठवलेला हा संदेश निषेधार्ह आहे असं माओ निंग यांनी म्हटलं. त्यानंतर आता फिलिपिन्सने एक पत्रक काढून चीनने गटारासारखी भाषा करु नये असं म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फिलिपिन्सच्या सुरक्षा सचिवांनी हेदेखील म्हटलं आहे की आम्ही तैवानला शुभेच्छा दिल्यावर चीनने दिलेली प्रतिक्रिया आश्चर्य वाटण्यासारखी नाही. आम्हालाच काय सगळ्या जगाला माहीत होतं की ते अशाच प्रकारे बोलणार. आता हा वाद पुढे किती वाढतो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.