जिनिव्हा : पूर्व लडाख भागामध्ये घुसखोरी केलेले चीनचे ७५ टक्के सैन्य माघारी गेले असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी दिली. जिनिव्हामध्ये आयोजित एका मुलाखतीत त्यांनी चीनबरोबर सुरू असलेल्या चर्चेबाबत माहिती दिली.

जयशंकर म्हणाले की, गलवान खोऱ्यामध्ये जून २०२०मध्ये झालेल्या संघर्षामुळे भारत आणि चीनच्या संबंधांवर परिणाम झाला. सीमेवर हिंसा होत असताना द्विपक्षीय संबंध त्यापासून दूर राहू शकत नाहीत. या परिस्थितीवर उपाय शोधण्यासाठी दोन्ही बाजूंच्या वाटाघाटी सुरू आहेत. साधारणपणे ७५ टक्के सैन्य माघारीचा प्रश्न निकाली निघाल्याचे ते म्हणाले. आणखी काही गोष्टी करणे बाकी आहे. सीमावादावर तोडगा निघाला तर दोन्ही देशांदरम्यानचे संबंध सुधारतील असेही परराष्ट्रमंत्र्यांनी सूचित केले. भारत-चीन संबंध गुंतागुंतीचे असल्याचे मान्य करतानाच १९८८मध्ये संबंध चांगले असताना अनेक मुद्द्यांवर सहमती झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> Jammu And Kashmir Assembly Polls: …तरीही जम्मूमध्ये मते भाजपलाच!

संपूर्ण सैन्य माघारीवर सहमती

नवी दिल्ली : लडाख सीमेवरून भारत आणि चीन या दोन्ही देशांनी सर्व सैन्य माघारी घेण्यासाठी गुरुवारी सहमती झाल्याची माहिती देण्यात आली. रशियाच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांची सेंट पीटर्सबर्ग येथे भेट घेतली. त्यावेळी सैन्य माघारीसाठी तातडीने आणि दुप्पट प्रयत्न करण्यावर सहमती झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चीनच्या आक्रमणामुळे लडाख सीमेवर दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करण्यात आले आहे. आम्हाला हा मुद्दा हाताळावाच लागेल. – एस. जयशंकर, परराष्ट्रमंत्री