Cisco Systems CEO Chuck Robbins : सध्याच्या काळात एआयची (AI) मोठी चर्चा आहे. एआयमुळे अनेकांच्या नोकऱ्या जाण्याची भिती व्यक्त केली जाते. या संदर्भात नेहमीच उलटसुलट चर्चा रंगताना पाहायला मिळते. मात्र, एआयमुळे होणाऱ्या बदलाचं अनेकजण कौतुक करतात. सध्या मोठमोठ्या कंपन्या एआयचा वापर करत असल्याचं दिसून येतं. मात्र, एआयमुळे खरंच लोकांच्या नोकऱ्या जातील का? असा सवाल कायम उपस्थित केला जातो. याच विषयाच्या अनुषंगाने सिस्कोचे सीईओ चक रॉबिन्स यांनी महत्वाचं विधान केलं आहे.

सीईओ चक रॉबिन्स यांनी एआयबाबत त्यांचं परखड मत मांडलं. सीईओ चक रॉबिन्स यांच्या मते कंपनी त्यांचे कर्मचारी कमी व्हावे किंवा कर्मचाऱ्यांची कपात करता यावी, यासाठी एआयचा वापर करत नाही. सध्या त्यांना लोकांपासून मुक्त व्हायचं नाही, असं रॉबिन्स यांनी म्हटलं आहे. दरम्यान, सध्याच्या परिस्थितीत अनेक मोठ्या टेक कंपन्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. मात्र, सिस्को कंपनी या संदर्भात वेगळा दृष्टिकोन स्वीकारत असल्याचा दावा चक रॉबिन्स यांनी केला आहे. या संदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इडियाने दिलं आहे.

रॉबिन्स यांच्या मते त्यांची कंपनी कर्मचाऱ्यांच्या कपातीसाठी एआयचा वापर करत नाही. तसेच त्यांच्या कंपनीतील अभियंते अधिक उत्पादक असतील. ज्यामुळे कंपनीला स्पर्धात्मक अधिक फायदा होईल. कारण मायक्रोसॉफ्ट आणि अमेझॉन या सारख्या कंपन्यांशी हे तुलनात्मक आहे. ज्यांनी अलीकडेच काही दिवसांपूर्वी हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. जुलैच्या सुरुवातीला मायक्रोसॉफ्टने ९,००० नोकऱ्या कमी केल्याचं सांगितलं जातं. रॉबिन्स यांनी कबूल केलं की त्यांचे अनेक सहकारी भविष्यात एआय तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे खूप कमी लोकांना कामावर ठेऊ शकतात. ही परिस्थिती भविष्यात सिस्कोतही येण्याची शक्यता नाकारत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

एआय स्ट्रॅटेजीला सिस्को काय चालना देत काय?

सिस्कोने कमाईत चांगल्या अपेक्षा ओलांडल्या आहेत. या यशाचं एक प्रमुख कारण म्हणजे एआय इन्फ्रास्ट्रक्चरवरील त्यांचं लक्ष. कंपनीने २०२५ च्या आर्थिक वर्षासाठी त्यांचं १ अब्ज डॉलर्सचं एआय इन्फ्रास्ट्रक्चर ऑर्डरचं दुप्पट केलं आहे. ज्यामध्ये केवळ चौथ्या तिमाहीतच ८०० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त ऑर्डर आल्या. हे ऑर्डर मुख्यत्वे वेबस्केल ग्राहक, अमेझॉन, मेटा प्लॅटफॉर्म आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या प्रमुख टेक कंपन्यांकडून आहेत. गुरुवारी सिस्कोच्या शेअरमध्ये १.५ टक्के घसरण झाली. त्याचं कारण म्हणजे त्याच्या सुरक्षा क्षेत्रातील कमकुवत कामगिरी.