राज्यातील सत्तानाट्याचा केंद्रबिंदू ठरलेल्या गुवाहाटीमधील प्रसिद्ध कामाख्या देवीसमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवस केला होता. मुख्यमंत्रीपद मिळाल्याने नवस फेडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातील आमदार गुवाहाटीला कामाख्या देवीचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले होते. दरम्यान दुपारी त्यांनी कामाख्या देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी कामाख्या देवीकडे काय प्रार्थना केली? यासंदर्भात माहिती दिली.

हेही वाचा – VIDEO: भर पत्रकार परिषदेत गुणरत्न सदावर्तेंवर शाईफेक का केली? संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते म्हणाले, “भाजपाचं पिल्लू…”

आज आम्ही सर्वांनी कामाख्या देवीचं मनोभावे दर्शन घेतलं. कामाख्या देवीच्या आशीर्वादाने महाराष्ट्रावरचं संकट दूर व्हावे. राज्यातील जनतेला सुख, समृद्धी, चांगले, आरोग्य लाभू दे. शेतकरी, कष्टकरी अशा सर्वच घटकांना सुख, समाधान मिळावं, अशी प्रार्थना आम्ही कामाख्या देवीच्या चरणी केली आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

हेही वाचा – “गुवाहाटीला कोणाचा बळी द्यायला चालले?” म्हणणाऱ्या अजित पवारांना मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “कामाख्या देवी कडक…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज आम्ही आसाममध्ये आलो आहे. इथल्या मुख्यमंत्र्यांनी तीन मंत्री आमच्या स्वागताला पाठवले होते. आसामच्या मुख्यमंत्र्यांशीही माजी भेट होणार आहे. त्यांनी ज्याप्रकारे आमचं स्वागत केलं. त्यासाठी मी आसाम सरकारचे आभार मानतो, असेही ते म्हणाले.