सहकारी संस्था अधिक सक्षम करणार- शहा

शहा यांनी आयएफएफसीओ आणि कृभको यासारख्या संस्थांना ३८ हजार हेक्टर रिक्त जमिनीचा वापर करून बियाणेनिर्मिती क्षेत्रात काम करण्यास सांगितले आहे.

देशातील सर्व सहकारी संस्थांना अधिक सक्षम करण्याचा सरकारचा निर्धार आहे, असे नव्यानेच निर्माण करण्यात आलेल्या सहकार खात्याचे मंत्री अमित शहा यांनी शनिवारी येथे सांगितले.

नॅशनल को-ऑप. युनियन ऑफ इंडियाचे अध्यक्ष दिलीप संघानी, आयएफएफसीओचे अध्यक्ष बी. एस. नकाई आणि व्यवस्थापकीय संचालक यू. एस. अवस्थी, नाफेडचे अध्यक्ष डॉ. बिजेंद्रसिंह या  सहकार क्षेत्रातील तज्ज्ञांची शनिवारी शहा यांनी भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व सहकारी संस्था अधिक सक्षम करण्याचे ठरविले आहे, असे शहा यांनी ट्वीट केले आहे.

शहा यांनी आयएफएफसीओ आणि कृभको यासारख्या संस्थांना ३८ हजार हेक्टर रिक्त जमिनीचा वापर करून बियाणेनिर्मिती क्षेत्रात काम करण्यास सांगितले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Co operative societies will be made more efficient by co operation minister amit shah akp

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या