पीटीआय, कांठी/घाटल/पुरुलिया

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर मतपेढीच्या राजकारणासाठी राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड केल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी केला. ममता यांनी घुसखोरांना दिलेल्या मोकळीकीमुळे राज्याची लोकसंख्या बदलत असल्याचा आरोपही शहा यांनी केला.

Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण
sharad pawar narendra modi (4)
“जर मोदींना स्पष्ट बहुमत मिळालं नाही, तर ते…”, शरद पवारांचं मोठं विधान; निवडणूक निकालांबाबत केलं भाष्य!
navi Mumbai lok sabha voting
Maharashtra Lok Sabha Election 2024 Phase 5 Voting Live: महाराष्ट्रात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४८.६६ टक्के मतदान!
Norway Ireland Spain recognize Palestine
नॉर्वे, आयर्लंड, स्पेनची पॅलेस्टाईनला मान्यता; आणखी एकट्या पडलेल्या इस्रायलकडून संतप्त प्रतिक्रिया
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
Yogendra Yadav BJP Win NDA Congress
“मी भाजपाच्या विजयाची भविष्यवाणी…”, योगेंद्र यादव यांनी दिलं स्पष्टीकरण, पुन्हा सांगितलं किती जागा मिळणार
Raghuram Rajan reuters
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला तर…”, भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांचं मोठं वक्तव्य
Most candidates in the fray for the first time since 1996 8360 candidates in the Lok Sabha elections
१९९६ नंतर प्रथमच सर्वाधिक उमेदवार रिंगणात; लोकसभा निवडणुकीत ८,३६० उमेदवार

कांठी, घाटल आणि पुरुलिया लोकसभा मतदारसंघात एकापाठोपाठ एक निवडणूक सभांना संबोधित करताना शहा यांनी ममता यांच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला. ते म्हणाले की, ‘‘भाजपने राज्यातील ३० लोकसभेच्या जागा जिंकल्यानंतर तृणमूल काँग्रेसचे विघटन होईल आणि ममता बॅनर्जी सरकारला निरोप दिला जाईल. बंगाल हे घुसखोरांसाठी सुरक्षित आश्रयस्थान बनले आहे. घुसखोरीमुळे राज्याची लोकसंख्या बदलत आहे, ज्याचा परिणाम केवळ बंगालमध्येच नाही तर संपूर्ण देशावर होत आहे. घुसखोरांना बंगालची लोकसंख्या बदलण्याची परवानगी देऊन ममता बॅनर्जी पाप करत आहेत आणि मतपेढीच्या राजकारणासाठी त्या राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करत आहेत’’, असा आरोप गृहमंत्री अमित शहा यांनी केला.

घुसखोर ही तृणमूल काँग्रेसची व्होट बँक असल्याचा आरोप शहा यांनी केला आणि ममता बॅनर्जी आपली व्होट बँक खुश करण्यासाठी नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) लागू करण्यास विरोध करत आहेत. रामकृष्ण मिशन आणि भारत सेवाश्रम संघाच्या काही संतांबद्दल बॅनर्जी यांच्या अलीकडील टिप्पणीबद्दल शहा यांनी टीका केली. ममता बॅनर्जी भारत सेवाश्रम संघावर हल्लाबोल करत आहेत, पण त्यांना हे माहीत नाही की जर हा संघ नसता तर बंगाल बांगलादेशचा भाग झाला असता. त्या फक्त त्यांची मतपेढीला खूश करण्यासाठी संतांना लक्ष्य करत आहेत, असा आरोपही शहा यांनी केली.

हेही वाचा >>>बंगालमधील अनेक वर्गांचा ओबीसी दर्जा रद्द; रिक्तपदांवरील आरक्षण बेकायदेशीर, उच्च न्यायालयाचा निर्णय

भाजपला या वेळी पश्चिम बंगालमध्ये ३० जागा मिळतील. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पश्चिम बंगालमध्ये ४२ पैकी १८ जागा जिंकल्या होत्या. बंगालमध्ये भाजपला ३० जागा मिळताच टीएमसीचे विघटन होईल आणि ममता बॅनर्जी सरकारला निरोप देण्यात येईल. शहा म्हणाले की, राजकीय हिंसाचारामुळे बंगालमध्ये लोकशाहीची हत्या झाली आहे. ते म्हणाले, ह्यह्णयेथे पंचायत निवडणुका झाल्या होत्या ज्यात २०० हून अधिक लोक मारले गेले होते, परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की यावेळी तुम्ही घाबरू नका कारण लोकसभा निवडणुकीच्या पाच टप्प्यात टीएमसीचे गुंड कोणाचेही नुकसान करू शकत नाहीत आणि आम्ही करू. यावेळी कोणाचेही नुकसान करू शकणार नाही. ‘‘गुंडांना धडा शिकवू.’’ मंगळवारी रात्री भाजप नेते सुभेंदू अधिकारी यांच्या निवासस्थानी छापे मारल्याचा संदर्भ देत शहा म्हणाले, ह्यह्णटीएमसी जितका सुभेंदू अधिकारी यांना त्रास देईल, तितकी भाजप त्यांना अधिक महत्त्व देईल. ‘‘ शहा म्हणाले की, तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे टीएमसीने ‘माँ माती माणूस’चा नारा बदलून ‘मुल्ला, मदरसा आणि माफिया’ केला आहे. टीएमसीच्या कथित तुष्टीकरणाच्या राजकारणाचा संदर्भ देत, शाह म्हणाले की ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पुतण्याला (अभिषेक बॅनर्जी) राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रणे पाठवली गेली होती, परंतु तृणमूलच्या व्होट बँक घुसखोरांना मिळू शकते या भीतीने त्यांनी उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून तृणमूलवर निशाणा साधत शहा म्हणाले की, बंगालमधील तृणमूलची ‘भ्रष्टाचाराची राजवट’ फक्त भाजपच संपवू शकते.