राष्ट्रीय आणि अंतर्गत सुरक्षेच्या मुद्दय़ावरून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेला काँग्रेसच्या नेत्यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे.
या दोन मुद्दय़ांवरून मोदी यांनी केलेल्या विधानांचा आंध्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बी. सत्यनारायण यांनी समाचार घेतला. कंदाहार विमान अपहरणप्रकरणी भाजपच्याच सरकारने अतिरेक्यांना सोडले होते, हे मोदी यांनी विसरू नये, अशी टीका सत्यनारायण यांनी केली. भाजप सत्तेवर असतानाच अक्षरधाम मंदिरावर अतिरेक्यांनी हल्ला केला होता, हे मोदी यांनी विसरू नये, असेही नारायण यांनी सुनावले. गरीबांच्या कल्याणासाठी युपीए सरकारने मनरेगासारख्या अनेक योजना राबविल्या आहेत, याकडे सत्यनारायण यांनी लक्ष वेधले.
संग्रहित लेख, दिनांक 13th Aug 2013 रोजी प्रकाशित
राष्ट्रीय सुरक्षा : मोदींचा दावा काँग्रेसला अमान्य
राष्ट्रीय आणि अंतर्गत सुरक्षेच्या मुद्दय़ावरून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेला काँग्रेसच्या नेत्यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे.
First published on: 13-08-2013 at 01:14 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress criticizes modis hyderabad speech