गुजरातमध्ये झालेल्या जातीय दंगलींमुळे इंडियन मुजाहिदीनसारखी दहशतवादी संघटना उदयाला आली, हा आरोप पक्षाचे सरचिटणीस शकील अहमद यांचे वैयक्तिक मत आहे. पक्ष त्याच्याशी सहमत नाही, असे कॉंग्रेसतर्फे सोमवारी स्पष्ट करण्यात आले. सध्यातरी हे विधान कॉंग्रेस पक्षाचे नसल्याचे पक्ष प्रवक्त्या रेणूका चौधरी यांनी सोमवारी सांगितले.
शकील अहमद यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलेल्या या वक्तव्यामुळे देशात राजकीय वादळ उठले होते. सोमवारी हे पक्षाचे मत नसल्याचे सांगत कॉंग्रेसने त्यातून अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला.
गुजरात दंगलींनंतर इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा उदय झाल्याचे राष्ट्रीय तपास संस्थेने आपल्या अहवालात नमून केले आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जातीय राजकारण करीत असल्याचा आरोपही शकील अहमद यांनी ट्विटच्या माध्यमातून केला होता.