कर्नाटकात भाजपाचे नेते येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर काँग्रेस आणि जनता दल सेक्यूलरच्या नेत्यांकडून विधिमंडळाच्या आवारातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्रिशंकू विधानसभा असलेल्या कर्नाटकात बुधवारी रात्री राज्यपाल वजूभाई वाला यांना अखेर भाजपाला सत्तास्थापनेसाठी पाचारण केले. याविरोधात काँग्रेसने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. मात्र, सुप्रीम कोर्टाने शपथविधी सोहळ्याला स्थगिती देण्यास नकार दिला. गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ते तिसऱ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले.

येडियुरप्पांच्या शपथविधी सोहळ्यानंतर काँग्रेस आणि जनता दल सेक्यूलरच्या आमदारांनी विधिमंडळाच्या आवारातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन केले. काँग्रेस नेते गुलाम नवी आझाद, अशोक गेहलोत, मल्लिकार्जून खरगे आदी नेते या प्रसंगी उपस्थित होते. रिसोर्टवर थांबलेले दोन्ही पक्षांचे आमदारही धरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी रवाना झाले.

‘सत्तास्थापनेसंदर्भात सुप्रीम कोर्टात प्रकरण प्रलंबित आहे. आता आम्ही जनतसमोर जाऊन भाजपाने लोकशाहीविरोधी कृत्य कसे केले हे सांगू, असे काँग्रेसचे नेते सिद्धरामैया यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress jds mlas and leaders protest outside karnataka assembly against bs yeddyurappa
First published on: 17-05-2018 at 10:05 IST