भाजपाच्या महिल्या नेत्याचा आक्षेपार्ह शब्दात उल्लेख केल्यानंतर वार निर्माण झाल्याने मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी अखेर माफी मागितली आहे. “जर आपलं वक्तव्य कोणाला आक्षेपार्ह वाटलं असेल तर आपण माफी मागत असल्याचं,” ते म्हणाले आहेत. ते म्हणाले आहेत की, “जर कोणालाही माझं वक्तव्य अनादर करणारं वाटलं असेल, तर मी दिलगिरी व्यक्त करतो”.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“भाजपाला आपला पराभव होणार असल्याची जाणीव झाली आहे. यामुळेच मूळ मुद्द्यांवरुन जनतेला भरकटवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांना जे काही म्हणायचं आहे ते बोलू देत, मी त्यांना यश मिळू देणार नाही,” असं कमलनाथ यांनी म्हटलं आहे. पुढे ते म्हणाले की, “ते म्हणतात मी अनादर करणारं वक्तव्य केलं…कोणतं वक्तव्य? पण जर कोणाला तसं वाटलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो”.

कमलनाथ यांनी मध्य प्रदेशच्या मंत्री इमरती देवी यांना उद्देशून ‘आयटम’ शब्द वापरल्यानंतर हा सगळा वाद सुरु झाला. याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने काँग्रेसचे नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याकडे सोमवारी स्पष्टीकरण मागितलं. आयोगाने हे प्रकरण आवश्यक त्या कारवाईसाठी निवडणूक आयोगाकडेही पाठवलं आहे.

‘कमलनाथ यांनी केलेल्या या बेजबाबदार व अपमानास्पद वक्तव्याबद्दल आयोग त्यांचा तीव्र निषेध करतो. या व्हिडीओमध्ये वापरलेले शब्द बदनामीकारक असून, महिलेच्या प्रतिष्ठेबाबत अनादर व्यक्त करतात’, असं आयोगाने एका निवेदनात सांगितले. जास्तीत जास्त महिलांनी राजकाणात यावे असे आम्हाला वाटत असतानाच, एका महिला नेत्याबाबत अशी अनादरकारक शेरेबाजी- तीही अशा महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीबद्दल- अतिशय दुर्दैवी आहे, असंही या निवेदनात म्हटलं आहे.

ग्वाल्हेरच्या डबरा मतदारसंघात भाजपने इमरती देवी यांना उभे केले आहे. येथील काँग्रेस उमेदवार हे साधे असून, इमरती देवी यांच्यासारखे ‘आयटम’ नाहीत, असे वक्तव्य रविवारी येथे एका निवडणूक प्रचारसभेतील भाषणात कमलनाथ यांनी केले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader kamal nath on item jibe for imarti devi sgy
First published on: 20-10-2020 at 07:49 IST