एक्स्प्रेस वृत्तसेवा, नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे ३० मेपासून तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर जाण्याचे नियोजन आहे. मात्र त्यांच्या पारपत्रासाठी ना-हरकत प्रमाणपत्र मिळण्याबाबत न्यायालय आज, शुक्रवारी देणार असलेल्या निर्णयावर त्यांचा हा दौरा अवलंबून असणार आहे.  तीन दिवसांच्या या दौऱ्यात राहुल गांधी अनिवासी भारतीय समुदाय, उद्योजक आणि माध्यमांचे प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधणार आहेत. सॅन फ्रान्सिस्को, वॉशिंग्टन डीसी आणि न्यू यॉर्क या शहरांमध्ये त्यांचे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 मात्र अखेरच्या क्षणी उद्भवलेला कायदेशीर अडथळा काँग्रेससाठी चिंतेचा विषय ठरला आहे. खासदार म्हणून अपात्र ठरल्यानंतर राहुल गांधी यांनी त्यांचे राजनैतिक पारपत्र ‘सरेंडर’ केल्यानंतर ‘सामान्य पारपत्र’ मिळण्यासाठी मागितलेल्या ना-हरकत प्रमाणपत्राबाबत दिल्लीचे एक न्यायालय आज, शुक्रवारी निर्णय देणार आहे. या दौऱ्याच्या कार्यक्रमानुसार, राहुल हे सॅन फ्रान्सिस्को, वॉशिंग्टन डीसी आणि न्यू यॉर्क येथे दोन दिवस घालवणार आहेत. ३० मे रोजी सांता क्लॅरा येथील सांता क्लारा मॅरियटमध्ये ते अनिवासी भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader rahul gandhi 3 day visit to america ysh
First published on: 26-05-2023 at 00:47 IST