नवी दिल्ली : केरळमधील सौर ऊर्जा घोटाळय़ातील महिला आरोपीच्या कथित लैंगिक शोषणप्रकरणी काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल यांची केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) चौकशी केली. सूत्रांनुसार गेल्या आठवडय़ात ही चौकशी करण्यात आली होती. वेणुगोपाल हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय समजले जातात.

वेणुगोपाल, केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चंडी आणि अन्य नेत्यांसह सहा जणांवर सहा वेगवेगळय़ा ठाण्यांमध्ये पोलिसांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. राज्य सरकारच्या शिफारसीनंतर सीबीआयने गेल्या वर्षी या प्रकरणी तपास सुरू केला होता. या प्रकरणातील अन्य आरोपींमध्ये हिबी इडन, अडूर प्रकाश, आमदार ए. पी. कुमार आणि भाजप नेते ए. पी. अब्दुल कुट्टी यांचा समावेश आहे. कुट्टी हे कन्नूर येथील काँग्रेसचे आमदार असताना गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिलेने १९ जुलै २०१३ मध्ये पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात दोन मंत्री आणि दोन माजी केंद्रीय मंत्र्यांसह काँग्रेस आणि यूडीएफच्या अनेक नेत्यांविरोधात लैंगिक अत्याचार आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.