काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, पंतप्रधान मनमोहन सिंह आणि इतर ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आज(बुधवार) काँग्रेसने लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आपला जाहीरनामा सादर केला. यावेळीचा जाहीरनामा राहुल गांधींच्या कल्पनेतून सुचविलेल्या नव्या पद्धतीनुसार तयार करण्यात आला आणि यासाठी पाच महिन्यांचा कालवधी लागल्याचे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले.
काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा हा प्रत्येक भारतीयाचा आवाज असल्याचे यावेळी राहुल गांधी म्हणाले तसेच जाहीरनाम्यात समाविष्ट करण्यात आलेली सर्व वचने पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करु असेही ते म्हणाले. २००९ सालच्या जाहीरनाम्यातील ९० टक्के आश्वासने काँग्रेसने पूर्ण केल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.
शेतकरी देशाचा कणा असून जाहीरनाम्यात शेतकऱयांच्या विकासादृष्टीने तरदूती उपलब्ध करण्याचे काँग्रेसचे प्रयत्न असतील त्याचबरोबर प्रत्येक भारतीयाला आपले स्वास्थ्य निरोगी राखण्याचा अधिकार असावा यासाठी आरोग्य अधिकारावर काम करण्याचाही काँग्रेस प्रयत्न करेल असे राहुल गांधींनी स्पष्ट केले.
राहुल गांधींच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेले ३१ संवाद कार्यक्रम, १५३ दिवसांचा दौऱा आणि १.३ लाख लोकांनी दिलेल्या ऑनलाईन सुचनांचा अभ्यासकरून जाहीरनामा तयार करण्यात आल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. 

पंतप्रधानांकडून काँग्रेसने साधलेल्या विकासाचा आढावा-
यावेळीचा जाहीरनामा जाहीर करण्याआधी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी आतापर्यंत काँग्रेसच्या काळात देशाने साधलेल्या विकासावर नजर टाकली. पंतप्रधान म्हणाले की,  प्रत्येकवेळी आपल्या जाहीरनाम्यातील उद्दीष्टे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. यूपीए-१ च्या कार्यकाळात विकासदर ८.४ टक्के होता आणि यूपीए-२ च्या कार्यकाळात ७.३ टक्के होता, तर एनडीएच्या काळात ६.८ टक्के विकास दर होता असेही पंतप्रधान म्हणाले.

काँग्रेसचा ‘लोकसभा निवडणूक २०१४’साठीचा जाहीरनामा वाचण्यासाठी पुढील छायाचित्रावर क्लिक करा: