scorecardresearch

भारत जोडो यात्रेबाबत अपप्रचार; पाच प्रकरणांत कायदेशीर कारवाई ; काँग्रेसचा भाजप नेत्यांवर खोटय़ा बातम्या पेरल्याचा आरोप

नवी दिल्ली : भाजपचे काही नेते व त्यांच्या समाज माध्यमांवर द्वेषमूलक प्रचार करणाऱ्या यंत्रणेद्वारे (ऑनलाइन हेट फॅक्टरी) खोटय़ा आणि समाजामध्ये फूट पाडण्यासाठी हेतुपुरस्सर बातम्या पेरल्या जात आहेत. या बातम्यांची गंभीर दखल घेतल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले. अशा पाच प्रकरणांत कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती पक्षाचे महासचिव जयराम रमेश यांनी दिली. रमेश यांनी केरळचे काँग्रेसचे खासदार […]

भारत जोडो यात्रेबाबत अपप्रचार; पाच प्रकरणांत कायदेशीर कारवाई ; काँग्रेसचा भाजप नेत्यांवर खोटय़ा बातम्या पेरल्याचा आरोप
पक्षाचे महासचिव जयराम रमेश

नवी दिल्ली : भाजपचे काही नेते व त्यांच्या समाज माध्यमांवर द्वेषमूलक प्रचार करणाऱ्या यंत्रणेद्वारे (ऑनलाइन हेट फॅक्टरी) खोटय़ा आणि समाजामध्ये फूट पाडण्यासाठी हेतुपुरस्सर बातम्या पेरल्या जात आहेत. या बातम्यांची गंभीर दखल घेतल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले. अशा पाच प्रकरणांत कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती पक्षाचे महासचिव जयराम रमेश यांनी दिली.

रमेश यांनी केरळचे काँग्रेसचे खासदार हिबी ईडेन यांनी पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीची प्रत ‘ट्विटर’वर प्रसृत केली. त्यांनी नमूद केले, की अशा खोटय़ा आणि फूट पाडण्यास फूस लावणाऱ्या बातम्यांच्या पाच प्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. काही भाजप नेते आणि त्यांचे भक्त हे प्रकार करत आहेत. आम्ही खोटारडेपणा सहन करणार नाही, असा इशारा आधीच दिला होता. त्यांनी प्रसृत केलेल्या ईडेन यांच्या तक्रारीत नमूद केले, की समाजमाध्यमांवर दोन छायाचित्रे आणि त्यासंबंधी मजकूर प्रसृत केला गेला होता. या छायाचित्रांद्वारे असे सूचित करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, की एका कार्यक्रमात ज्या युवतीने ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या होत्या तिच्यासोबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी छायाचित्र काढले. प्रत्यक्षात राहुल गांधी यांच्यासह छायाचित्र काढून घेणारी ही तरुणी वेगळीच आहे. पोलिसांनी संबंधित कायदेशीर कलमांनुसार या प्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या