१५ व्या लोकसभेच सूप शुक्रवारी वाजल़े त्यामुळे संसदीय शह-काटशहाच्या राजकारणाला तूर्त विराम मिळाला आह़े आता लढत आहे ती थेट मैदानातच! लोकसभा निवडणुकांचे हे मैदान आता दोन महिन्यांच्या अंतरावर येऊन ठेपले आह़े प्रचाराचा धुरळा उसळायला आधीच सुरुवात झाली आह़े आता त्याला अधिक रंगत येणार आह़े शर्यतीत धावणारे कोण आणि नुसत्या टाळ्या पिटणारे कोण, याच्या निवडीचा हा टप्पा आह़े पक्ष कोणताही असो निवडणुकांचा रंग तर प्रत्येकाला चढू लागला आहे.
लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी उमेदवार निवडताना त्यामध्ये तळागाळातील कार्यकर्त्यांचा सहभाग असावा यासाठी काँग्रेसने आता उमेदवारांची प्रायोगिक तत्त्वावर पूर्वपरीक्षा घेण्याचे ठरविले आहे. याचा पहिला प्रयोग नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघात करण्यात येणार आहे. सध्या काँग्रेसचे नेते अजय माकन हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत.
देशातील १५ मतदारसंघांत उमेदवारांची पूर्वपरीक्षा घेण्याबाबतची संकल्पना काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मांडली. अमेरिकेच्या अध्यक्षांच्या निवडीच्या धर्तीवर आता मतदार याद्या तयार करणे आणि काँग्रेसच्या विविध युनिटचे पदाधिकारी यांची नावे समाविष्ट करण्यात येणार आहेत. येत्या २४ फेब्रुवारी रोजी मतदार याद्यांचा मसुदा जाहीर करण्यात येणार असून इच्छुक उमेदवारांनी २७ फेब्रुवारीपर्यंत आपले उमेदवारी अर्ज सादर करावयाचे आहेत. त्यानंतर मतदानाची तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचे निवडणूक अधिकारी एन. डिसूझा यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यात पूर्वपरीक्षा प्रकल्प नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघात सुरू करण्यात येणार असून, त्यानंतर तो उत्तर-पूर्व लोकसभा मतदारसंघात सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपल्या पसंतीच्या उमेदवारची निवड करता येणार आहे.
ज्या मतदारांची आणि उमेदवारांची गुन्हेगारी पाश्र्वभूमी आहे, अशांना या प्रकल्पापासून दूर ठेवण्यात येणार आहे. आम आदमी पार्टीने (आप) अशा प्रकारच्या प्रकल्पाची कोणतीही योजना आखली नाही, अथवा अंमलबजावणीही केलेली नाही, असे डिसूझा म्हणाल्या.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Feb 2014 रोजी प्रकाशित
काँग्रेसची आता उमेदवार निवडीसाठी पूर्वपरीक्षा
लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी उमेदवार निवडताना त्यामध्ये तळागाळातील कार्यकर्त्यांचा सहभाग असावा यासाठी काँग्रेसने आता उमेदवारांची प्रायोगिक तत्त्वावर पूर्वपरीक्षा घेण्याचे ठरविले आहे.
First published on: 23-02-2014 at 04:37 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress to conduct exam to choose lok sabha candidate