जल संवर्धनाच्या मुद्द्यावरुन मध्य प्रदेशातील रेवा मतदारसंघाचे भाजपा खासदार जनार्धन मिश्रा यांनी एक अजब वक्तव्य केलं आहे. “जमिनीतील पाणी आटत चाललं आहे. त्यामुळे पाणी वाचवलं पाहिजे. गुटखा खा, दारू प्या, थीनरचा वास घ्या किंवा आयोडेक्स खा… पण पाण्याचे महत्त्व समजून घ्या”, असं वक्तव्य मिश्रा यांनी रेवामध्ये जल संवर्धनाच्या शिबिरात केलं आहे.

“हिंदू शब्दाचा अर्थ ऐकून लाज वाटेल” काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यानं नवा वाद, ‘हिंदू’ पर्शियन शब्द असल्याचाही दावा

रेवामधील क्रिष्णराज कपूर सभागृहात या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमातील जनार्धन मिश्रा यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ते पाणी वाचवण्याचे आवाहन करताना दिसत आहेत. “पाण्याव्यतिरिक्त कुठल्याही कराची माफी द्या. मात्र, पाणीपट्टी आम्ही भरू, असं एखाद्या सरकारनं पाणीपट्टी माफीची घोषणा केल्यावर सांगा”, असं आवाहनही या शिबिरात मिश्रा यांनी केलं आहे.

‘हर हर महादेव’वरुन NCP vs MNS: आव्हाडांचा ‘अफझलखाचे स्वयंघोषित प्रवक्ते’ असा उल्लेख करत मनसेचा हल्लाबोल

“दरवर्षी पाण्याची पातळी घसरत चालली आहे. पाण्याचा वापर वाढत असताना हे होणारच आहे. जेव्हा पैसा खर्च केला जाणार, तेव्हाच पाणी वाचवलं जाईल”, असंही मिश्रा यांनी म्हटलं आहे. मिश्रा यांनी याआधीही बऱ्याच वक्तव्यांमुळे वाद ओढवून घेतला आहे. हातांनी शौचालयाची साफसफाई करतानाचा त्यांचा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला होता.