पुणे : ओमायक्रॉनच्या फैलावाबरोबरच रुग्णसंख्या वाढू लागली असताना देशाच्या करोनाविरोधी लढयाला नवे बळ मिळाले आह़े  केंद्रीय औषध महानियंत्रक कार्यालयाने कोव्होव्हॅक्स आणि कोर्बिव्हॅक्स या दोन करोना प्रतिबंधक लशींच्या आपत्कालीन वापरास मंगळवारी परवानगी दिली़  तसेच विषाणूविरोधी औषध मॉल्नुपिरावीरच्या आपत्कालीन वापरासही परवानगी देण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी सांगितल़े

 सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया आणि नोवाव्हॅक्स यांच्या संयुक्त भागीदारीतून कोव्होव्हॅक्स आणि हैद्राबादस्थित बायोलॉजिकल-ई या कंपनीने कोर्बिव्हॅक्स लशीची निर्मिती केली आह़े  या दोन्ही लशींना केंद्रीय औषध महानियंत्रक कार्यालयाकडून आपत्कालीन वापरास परवानगी देण्यात आल्याची माहिती मनसुख मंडाविया यांनी ट्विटरद्वारे दिली. नोवाव्हॅक्सतर्फे विकसित करण्यात आलेल्या कोव्होव्हॅक्स या लशीचे उत्पादन आणि विपणन भारतात सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियातर्फे करण्यात येणार आहे. कोर्बिव्हॅक्स ही लस संपूर्ण भारतीय बनावटीची असून भारतात तयार झालेली करोना प्रतिबंधात्मक तिसरी लस ठरली आहे.

russia grain diplomacy
यूपीएससी सूत्र : रशियाची ‘अन्नधान्य डिप्लोमसी’ अन् भारताच्या कृषी निर्यातीत झालेली घट, वाचा सविस्तर…
loksatta analysis heavy obligations reason behind elon musk delaying tesla in india
विश्लेषण : टेस्लाच्या वाटचालीत स्पीडब्रेकर? जगभर मागणीत घट का? भारतात आगमन लांबणीवर?
Mahindra XUV 3X0 bookings open
महिंद्राच्या नव्या SUV कारला देशातील बाजारपेठेत दाखल होण्यापूर्वीच मोठी मागणी; बुकींग सुरु, पाहा किती मोजावे लागणार पैसे
apple sent alert emails to iphone users
काही भारतीयांच्या ‘आयफोन’मध्ये स्पायवेअर असू शकतं; अ‍ॅपलची धोक्याची सूचना!

मॉल्नुपिरावीर या औषधाचे उत्पादन देशातील १३ औषध उत्पादक कंपन्या करणार असून, ज्येष्ठ आणि सहव्याधीग्रस्त रुग्णांमध्ये आपत्कालीन नियंत्रित वापरासाठी केंद्रीय औषध महानियंत्रक कार्यालयाने परवानगी दिली आहे. 

या निर्णयाबाबत सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला म्हणाले, केंद्रीय औषध महानियंत्रक कार्यालयाकडून कोव्होव्हॅक्स लशीच्या आपत्कालीन वापरासाठी मिळालेली परवानगी भारतातील करोना प्रतिबंधात्मक लसीकरण कार्यक्रमाला बळकटी देणारी आहे. करोनाला तब्बल ९० टक्केपर्यंत प्रतिबंध करण्याची क्षमता असलेली प्रथिन आधारित लस देशाच्या लसीकरण कार्यक्रमाला देत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. करोना लसीकरणाची व्याप्ती जेवढी वाढेल त्या प्रमाणात या महासाथीवर मात करणे आपल्याला शक्य होईल.

 आपत्कालीन वापराच्या परवानगीमुळे भारतात लसीकरण कार्यक्रमाचा वेग वाढवणे शक्य आहे. नोवाव्हॅक्स आणि सीरमच्या संयुक्त प्रयत्नातून तयार झालेल्या या लशीला नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेसह इंडोनेशिया, फिलिपिन्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझिलंड, युनायटेड किंग्डम या देशांनी आपत्कालीन वापराला परवानगी दिली आहे. भारतात तीन जानेवारीपासून १५ ते १८ वर्ष वयोगटासाठी लसीकरण खुले करत असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर कोव्होव्हॅक्स लशीच्या आपत्कालीन वापराला मिळालेली परवानगी महत्त्वाची आहे.

दिल्लीत कठोर निर्बंध

दिल्लीत मंगळवारी रुग्णसंख्येत मोठी वाढ नोंदविण्यात आली असून, तिथे कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत़ शाळा, चित्रपटगृहे, व्यायामशाळा, उद्याने बंद ठेवण्यात आली आहेत़  बार, रेस्टॉरंटबरोबरच सार्वजनिक वाहतुकीस निम्म्या क्षमतेने मुभा असेल़

राज्यात २१७२ नवे रुग्ण मुंबई : राज्यात मंगळवारी करोनाचे २१७२ नवे रुग्ण आढळल़े  मुंबईत सर्वाधिक १३७७ नवे रुग्ण आढळले आहेत. मुंबईत गेल्या आठवडय़ात एक टक्क्यांपेक्षाही कमी असलेले बाधितांचे प्रमाण आता तीन टक्क्यांवर गेले असल्यामुळे शहर तिसऱ्या लाटेच्या उंबरठय़ावर असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आह़े  राज्यात गेल्या आठवडय़ात दैनंदिन रुग्णसंख्येने हजाराचा टप्पा पार केला होता. या आठवडय़ाच्या सुरुवातीलाच दैनंदिन रुग्णसंख्येने दोन हजाराचा आकडा पार केल्यामुळे जवळपास आठ ते नऊ दिवसांतच राज्यातील करोना रुग्णांचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. राज्यात सर्वाधिक झपाटय़ाने करोनाचा प्रसार मुंबईत होत असून राज्यातील एकूण रुग्णसंख्येत सुमारे ६३ टक्के रुग्ण हे मुंबईत आढळले आहेत.