पेट्रोलियम मंत्रालयात झालेल्या हेरगिरीची धग पर्यावरण मंत्रालयापर्यंतही पोहोचली असून त्या मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या स्वीय सचिवास पोलिसांनी गुरुवारी अटक केली. याखेरीज आणखी एकाला अटक करण्यात आली आहे.
वन आणि पर्यावरण मंत्रालयातील सहसचिवांचे स्वीय सचिव जितेंद्र नागपाल व यूपीएससी सदस्यांचे खासगी सचिव विपन कुमार यांना अटक करण्यात आल्याची माहिती गुन्हे विभागाचे सहआयुक्त रवींद्र यादव यांनी दिली. आतापर्यंत या प्रकरणी १६ जणांना अटक करण्यात आली असून दोन प्राथमिक आरोपपत्रेही दाखल झाल्याचे सांगण्यात आले.
विपन कुमार आधी पेट्रोलियम मंत्रालयात कार्यरत होता आणि त्याला त्याच्या ‘मदतनीसां’कडून गुप्त स्वरूपाचे दस्तावेज मिळत होते.
संग्रहित लेख, दिनांक 27th Feb 2015 रोजी प्रकाशित
पेट्रोलियम मंत्रालयातील हेरगिरीची झळ पर्यावरण मंत्रालयासही
पेट्रोलियम मंत्रालयात झालेल्या हेरगिरीची धग पर्यावरण मंत्रालयापर्यंतही पोहोचली असून त्या मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या स्वीय सचिवास पोलिसांनी गुरुवारी अटक केली.
First published on: 27-02-2015 at 02:13 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corporate espionage ps to joint secretary in environment ministry among 2 arrested