scorecardresearch

Premium

रोजच्या वापरातील वस्तूंवरचा जीएसटी कमी होणार?

१० नोव्हेंबरला होणार जीएसटी परिषदेची बैठक

government revenue increases in first fifteen days of gst
( संग्रहित छायाचित्र )

जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यापासूनच तो कमी करण्याची मागणी होते आहे. ज्या वस्तूंवरचा कर हा २८ टक्के आहे तो कमी करण्याची मागणी व्यापारी, जनता आणि विरोधक या सगळ्यांकडून वारंवार होते आहे. याच सगळ्याचा विचार करून १० नोव्हेंबरला केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत रोजच्या वापरातील वस्तूंवर असलेला जीएसटी कमी होण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. ही चर्चा सकारात्मक ठरली तर अनेक महत्त्वाच्या वस्तूंवर असलेला जीएसटी कमी होऊ शकतो.

सध्या दैनंदिन वापराच्या अनेक वस्तूंवर २८ टक्के जीएसटी आहे. त्यामुळे अनेक वस्तू महागल्या आहेत. लघू आणि मध्यम उद्योजकांचेही यामुळे नुकसान होते आहे. मात्र आता प्लास्टिकच्या वस्तू, शँपू, हाताने तयार करण्यात आलेले फर्निचर या आणि अशा इतर अनेक वस्तूंवरचा कर कमी होण्याची शक्यता आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे. १ जुलै २०१७ रोजी जीएसटी लागू करण्यात आला. त्यानंतर दर महिन्याला जीएसटी परिषदेची बैठक होते आहे. आता या महिन्यात १० तारखेला होणाऱ्या बैठकीत दैनंदिन वापरातील वस्तूंवर असलेला २८ टक्के जीएसटी कमी केला जाण्याबाबत चर्चा होणार आहे. हा कर २८ वरून १८ टक्क्यांवर येऊ शकतो अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.

कोणत्या वस्तूंवरचा जीएसटी कमी होण्याची शक्यता?

हाताने तयार करण्यात आलेले लाकडी फर्निचर, प्लास्टिकची उत्पादने, शॉवर बाथ, शँपू, सिंक, वॉश बेसिन, सीट आणि सीट कव्हर, इलेक्ट्रीक स्विच.

या आणि इतर अशा वस्तू ज्यांच्यावर २८ टक्के जीएसटी लावण्यात आला आहे, तो कमी करण्यावर १० नोव्हेंबरच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजते आहे. ज्या उद्योगांना २८ टक्के जीएसटीचा फटका बसला आहे त्या सगळ्याबाबतही या बैठकीत चर्चा होणार आहे. सध्या २८ टक्के असलेला जीएसटी जर १८ टक्क्यांवर आला तर निश्चितच व्यापारी, उद्योजक आणि जनतेला दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Council to consider slashing gst on common use goods

First published on: 05-11-2017 at 17:03 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×