scorecardresearch

Premium

कर्नाटकच्या प्रसिद्ध रिसॉर्टमध्ये आढळला तिघांचा मृतदेह; पोलीस म्हणाले, “मुलीची हत्या करून आई-वडिलांनी…”

पोलिसांनी कुटुंबाच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असून पुढील अधिक चौकशी सुरू केली आहे.

crime
कर्नाटकमध्ये नेमकं काय घडलं? (फोटो – प्रातिनिधिक छायाचित्र)

कर्नाटकातील कोडागु येथील एका रिसॉर्टमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या रिसॉर्टमध्ये फिरायला आलेल्या तिघांचा मृतदेह खोलीत आढळून आला. या मृतांमध्ये ११ वर्षांच्या मुलीसह तिच्या आई-वडिलांचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ धाव घेत चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली.

केरळच्या कोट्टायम येथील रहिवासी असलेले विनोद (४३), पत्नी झुबी अब्राहम (३७) आणि मुलगी जोहान (११) हे कोडागू येथील एका रिसॉर्टमध्ये फिरण्याकरता आले होते. या कुटुंबाने शनिवारी जंगल आणि डोंगराळ प्रदेशातील पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेल्या रिसॉर्टमध्ये चेक इन केले. परंतु, त्यांचा मृतदेह खोलीत आढळून आला. पोलिसांनी चौकशी केली असता हे आत्महत्येचं प्रकरण असल्याचं समोर आलं. कारण, त्यांना या खोलीत सुसाईड नोट सापडली आहे.

punjab bjp, farmer protest
तरुण शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर पंजाबमध्ये संताप, जनभावना ओळखून भाजपाच्या नेत्यांनी सोडले मौन!
farmer family performed last rites of ox
चंद्रपूर : पशू नव्हे कुटुंबातील सदस्यच! लाडक्या ‘लखन’च्या मृत्यूनंतर बळीराजाकडून तेरावी; बैलाच्या मृत्यूने शेतकरी कुटुंब…
Alexei Navalny Death
अलेक्सी नवाल्नींची शक्ती अन् प्रेरणास्थान राहिलीय ‘युलिया; पतीच्या मृत्यूनंतर पत्नीची पहिली पोस्ट चर्चेत
attack on friend of accused in Gulabe massacre in Pachpavali nagpur
उपराजधानीत टोळीयुद्धाचा भडका! पाचपावलीतील गुलाबे हत्याकांडातील आरोपींच्या मित्रावर जीवघेणा हल्ला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या जोडप्याने आधी आपल्या ११ वर्षीय मुलीची हत्या केली. त्यानंतर, दोघांनी आत्महत्या केली. तसंच, सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी आर्थिक विवंचनेचं कारण दिलं आहे. ते अत्यंत आर्थिक अडचणींचा सामना करत होते, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पोलिसांनी कुटुंबाच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असून पुढील अधिक चौकशी सुरू केली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Couple kills 11 year old daughter dies by suicide at karnataka resort sgk

First published on: 10-12-2023 at 15:28 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×