नवी दिल्ली : देशात एकूण आठ राज्यात करोना रुग्णांतील दैनंदिन वाढ सर्वाधिक म्हणजे ८१.४२ टक्के इतकी नोंदवली गेली आहे. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगड, दिल्ली, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश या राज्यात करोना संसर्गाचा दर जास्त आहे. भारतात उपचाराधीन कोविड रुग्णांची संख्या ६ लाख ५८ हजार ९०९ पर्यंत वाढली आहे. एकूण रुग्णांच्या हे प्रमाण ५.३२ टक्के आहे. दिवसभरात ४४२१३ इतक्या प्रमाणात उपचाराधीन रुग्णवाढ झाली आहे. पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे, नाशिक, बेंगळुरू शहर, औरंगाबाद, दिल्ली, अहमदनगर, नांदेड या जिल्ह्य़ात उपचाराधीन रुग्णांच्या पन्नास टक्के रुग्ण आहेत. महाराष्ट्रात रुग्ण संख्या ९ पट वाढली असून दोन महिन्यातली ही सर्वाधिक वाढ आहे. पंजाबात सर्वाधिक उपचाराधीन रुग्ण आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगड, केरळ, पंजाब या राज्यात एकूण उपाचाराधीन रुग्णांच्या ७७.३ टक्के रुग्ण असून महाराष्ट्रात हे प्रमाण ५९.३६ टक्के आहे.  भारतात शनिवारी ८९,१२९ इतके रुग्ण नोंदले गेले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका दिवसात वाढले आहेत. गेल्या साडेसहा महिन्यातील ही सर्वाधिक वाढ असून एकूण रुग्ण संख्या आता १.२३ कोटी झाली आहे असे आ रोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Covid corona virus infection corona patient in eight state akp
First published on: 04-04-2021 at 00:16 IST