गोरक्षा, गोरक्षक आणि गोमांसावरून देशात सुरू असलेल्या वादादरम्यानच अमेरिकेतून एक चांगली बातमी आली आहे. गायीच्या मदतीने आता एचआयव्ही म्हणजेच एड्सविरोधी लस बनवता येईल. अमेरिकन जर्नल ‘नेचर’ मध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार गायीतील अँटिबॉडी म्हणजेच रोग प्रतिकारक क्षमतेने एचआयव्हीचा परिणाम ४२ दिवसांत २० टक्क्यांनी कमी केला जाऊ शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यासाठी शास्त्रज्ञांनी ४ गायींना या प्रयोगासाठी निवडले होते. या गायींना एचआयव्हीचे २-२ इंजेक्शन दिले गेले. एका महिन्यानंतर त्यांच्यामध्ये प्रतिरक्षी कोषिका विकसित होऊ लागले. या संशोधनानुसार, ३८१ दिवसांत हे अँटिबॉडीज एचआयव्हीचा परिणाम ९६ टक्के संपुष्टात आणून शकतात. जटील आणि जिवाणूयुक्त पचन तंत्रामुळे गायींमध्ये प्रतिकारक क्षमता जास्त विकसित होते, असे मानले जाते. अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने हे खूप उपयोगी असल्याचे सांगितले. भारतात सुमारे २२ लाख एड्सबाधित रूग्ण आहेत.

एड्समुळे मनुष्याच्या शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता कमी होते. यावर अजूनपर्यंत इलाज शोधण्यात यश आलेले नाही. शास्त्रज्ञांकडून यावर सातत्याने प्रयोग केला जात आहेत. गायीच्या मदतीने एक लस बनवता येईल, असे या अहवालात म्हटले आहे. या लसीच्या मदतीने एचआयव्ही पीडित व्यक्तीला पहिल्या टप्प्यातून वाचवता येऊ शकते. परंतु, मनुष्याच्या शरीरात अशी रोगप्रतिकारक क्षमता तयार होण्यास जास्त वेळ लागतो. उल्लेखनीय म्हणजे, वेद आणि पुराणांमध्येही गायीचे दूध, गोमूत्र आणि शेण खूप उपयुक्त असल्याचे सांगण्यात आले आहे. यात संशोधन व्हावे यासाठी केंद्र सरकारने १९ सदस्यीय समितीची नेमणूक केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cows hold clue to hiv aids cure researchers find in america
First published on: 23-07-2017 at 09:16 IST