विश्वचषकात दमदार कामगिरीद्वारे छाप पाडणारे भारतीय खेळाडू केशरचनेच्या बाबतीतही आघाडीवर आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुरुवारी कर्णधार विराट कोहली, हार्दिक पंडय़ा, यजुर्वेद्र चहल आणि महेंद्रसिंह धोनी यांचे यंदाच्या विश्वचषकातील नव्या केशरचनेतील छायाचित्र ‘ट्विटर’वर पोस्ट करून चाहत्यांनाच ‘‘यामधून कोणाची केशरचना सर्वात आकर्षक व अप्रतिम आहे?’’ असे विचारले. दिवसभर या पोस्टवर अनेकांनी ‘रिट्वीट’ करत कोहली व चहलच्या केशरचनेला सर्वाधिक पसंती दर्शवली, तर काहींनी धोनीने कोणतीही केशरचना केली तरी तो नेहमीच सर्वामध्ये उठावदार ठरतो, अशी प्रतिक्रियाही व्यक्त केली. त्याशिवाय हार्दिकने मानेखाली काढलेल्या टॅटूबाबतही चाहत्यांमध्ये चर्चा रंगली होती.
संग्रहित लेख, दिनांक 21st Jun 2019 रोजी प्रकाशित
Cricket World Cup 2019 : चर्चा तर होणारच.. केशरचनेतही भारताचेच वर्चस्व
विश्वचषकात दमदार कामगिरीद्वारे छाप पाडणारे भारतीय खेळाडू केशरचनेच्या बाबतीतही आघाडीवर आहेत.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 21-06-2019 at 01:37 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cricket world cup 2019 latest hairstyle of indian cricketers zws