Crime News : वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तरुण आठ वर्षांनी पॅरोल रजेवर बाहेरआला त्यावेळी त्याच्यावर गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली. ग्वाल्हेर शिवपुरी जिल्ह्यातल्या सतनवाडा भागात ही घटना घडली. या घटनेचा तपास जेव्हा झाला तेव्हा या हत्येचा मागे ज्याची हत्या झाली त्याचा ASI भाऊच असल्याची माहिती समोर आली.

अजय तोमरची हत्या मागच्या बुधवारी करण्यात आली

अजय तोमर असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव होतं. २०१७ मध्ये हनुमान सिंह तोमर यांची हत्या अजयने केली. या हत्ये प्रकरणी अजयला शिक्षा झाली. पण आठ वर्षांनी जेव्हा तो पॅरोलवर बाहेर आला तेव्हा त्याच्यावर गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली. या हत्येमागे अजयचा भाऊ आणि पोलीस अधिकारी असलेला भानू तोमरच होता ही बाब तपासात उघडकीस आली. अजय पॅरोलवर आला तेव्हा भानू तोमरने अजयची हत्या घडवून आणली. त्यासाठी त्याने इन्स्टाग्रामवर सुपारी किलर्सनला सुपारी दिली होती.

२०१७ मध्ये दोन भावांमध्ये शत्रुत्व

वडिलांची हत्या अजयने केल्यानंतर भानू आणि अजय या दोन सख्ख्या भावांमध्ये वितुष्ट आलं. हनुमान तोमर हे २०१७ मध्ये पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या हत्येनंतर अनुकंपा तत्त्वावर भानूला ही नोकरी मिळाली आणि त्याला पोलीस सब इन्स्पेक्टर हे पदही मिळालं. मात्र जी घटना घडली त्यामुळे भानू आतून उद्ध्वस्त झाला होता आणि त्याच्या मनात सूडाची आग पेटली होती. वडिलांची हत्या केल्याप्रकरणी अजयला जन्मठेपेची शिक्षा झाली. त्याच दरम्यान त्याच्या पत्नीनेही त्याला घटस्फोट दिला. अजय पॅरोलवर बाहेर आला तेव्हा त्याने मालमत्तेत वाटा मागितला. पण भानूने तोपर्यंत त्याचं वडिलोपार्जित घर विकलं होतं. आता अजय येऊन वाटा मागू लागल्याने भानूचा राग आणखी वाढला. १४ जुलैच्या दिवशी अजय पॅरोलवर बाहेर आला होता. त्यानंतर साधारण आठवडाभराने म्हणजेच २३ जुलैला अजय ग्वाल्हेरहून परतत होता त्यावेळी एका महिलेने त्याची कार थांबवली. त्याच ठिकाणी अज्ञात हल्लेखोरांनी अजयवर गोळ्या झाडल्या आणि त्याची हत्या केली. अजय च्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यातही भानू आला होता. आपल्यावर कुणाला संशय येणार नाही असं त्याला वाटलं होतं. पण शेवटी खुनाला वाचा फुटलीच. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.

५०० सीसीटीव्ही तपासण्यात आले आणि…

शिवपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधीक्षक अमन सिंह राठोड यांनी या प्रककरणात जातीने लक्ष घातलं होतं. अजयला ज्या महिलेने थांबवलं होतं तिचा सुगावा लागला. ती इंदूरच्या बालसुधारगृहातून १२ जुलै रोजी पळून गेली होती. तसंच सीसीटीव्ही फुटेजमध्ये भानूच्या कारमधून ती उतरते आहे असंही आढळलं ज्यानंतर तपासाची चक्रं फिरली. अजयची हत्या करण्यासाठी भानूने धर्मेंद्र कुशवाहाला संपर्क केला होता. धर्मेंद्र कुशवाहाला २०११ मध्ये एका हत्या प्रकरणात शिक्षा झाली होती. तुरुंगात तो अजयला भेटला होता. भानूने त्याच्याशी संपर्क साधला आणि इन्स्टाग्रावर त्याला फोटोही पाठवला. अजयची हत्या करण्यासाठी धर्मेंद्र कुशवाहाला एक लाख रुपये मिळाले होते जे भानूने त्याला दिले होते. महिलेने कार थांबवली त्यानंतर अजयवर धर्मेंद्रने गोळ्या झाडल्या आणि त्याची हत्या केली. भानू देखील कारने अजय च्या गाडीचा पाठलाग करत होता ही बाबही समोर आली आहे. आता भानूला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील कारवाई करण्यात येत आहे.