द्रमुक नेते आणि तामिळनाडूचे युवक कल्याण मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावरून केलेल्या टिप्पणीवरून त्यांच्यावर सर्वत्र टीका होत आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर त्यांचं हे वक्तव्य बाहेर आल्याने इंडिया आघाडीच्या घटकपक्षासमोरही मोठा पेच निर्माण झाला आहे. यावरून इंडिया आघाडीला सत्ताधाऱ्यांनी लक्ष्य केलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी द्रमुकवर टीका केली आहे.

द्रमुक म्हणजेच द्रविड मुन्नेन कडगम हा तामिळनाडूतील सर्वांत महत्त्वाचा स्थानिक आणि सत्ताधारी पक्ष आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी गेल्या आठवड्यात सनातन धर्मावरून टीका केली होती. “सनातन धर्म हा समानता आणि सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे. त्यामुळे अशा गोष्टींना विरोध करण्याऐवजी त्यांचं समूळ उच्चाटन करायला हवं. डास, डेंग्यू, मलेरिया आणि करोनासारख्या आजारांना विरोध करता येऊ शकत नाही. त्यांचं उच्चाटनच करायला हवं. त्याचप्रमाणे सनातन धर्माचंही उच्चाटन व्हायला हवं,” असं उदयनिधी स्टॅलिन म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद देशभर उमटले होते.

हेही वाचा >> उदयनिधींच्या वक्तव्यावर योगी आदित्यनाथ बरसले!, “रावणाचा अहंकार, बाबर आणि औरंगजेबाचा अत्याचार..”

द्रमुक हा इंडिया आघाडीतील एक घटकपक्ष आहे. त्यामुळे एनडीएकडून त्यांच्यावर टीका केली जात होती. इंडिया आघाडीतील इतर घटकपक्ष यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. दरम्यान, काँग्रेसचे नेते आचार्य कृष्णम यांनी द्रमुकवर टीका केली आहे.”D-डेंगू M-मलेरिया K-कुष्ठ रोग= DMK”, असा उपहासात्मक शब्दविस्तार आचार्य प्रमोद यांनी केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एम.के स्टॅलिन यांची काय होती प्रतिक्रिया?

एम. के. स्टॅलिन म्हणाले, “उदयनिधी यांनी सनातन धर्मात दलित, आदिवासी आणि महिलांबरोबर होणाऱ्या भेदभावावर मत व्यक्त केलं. त्यांचा कोणत्याही धर्माला किंवा श्रद्धेला दुखावण्याचा हेतू नव्हता. उदयनिधी यांनी सनातन धर्मातील शोषण करणाऱ्या या गोष्टींवर बोलणं भाजपा समर्थकांना सहन झालं नाही. त्यामुळे त्यांनी उदयनिधी यांनी सनातनी लोकांचा नरसंहार केल्याचा खोटा प्रचार केला.”