जम्मू-काश्मीरमध्ये पुढच्या काही वर्षांत सुरक्षा दलाची गरज भासणार नाही, असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलंय. ते शनिवारी जम्मूमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ८३ व्या स्थापना दिनानिमित्त बोलत होते. यावेळी त्यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादाविरुद्ध लढ्याबद्दल आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी CRPFनं केलेल्या कामाचं कौतुक केलं.

“जम्मू आणि काश्मीर, नक्षलग्रस्त भाग आणि ईशान्येकडील भागात सीआरपीएफ ज्या मेहनतीने  काम करत आहे, मला खात्री आहे की पुढील काही वर्षांत या तिन्ही प्रदेशांमध्ये सीआरपीएफची गरज भासणार नाही. याचे संपूर्ण श्रेय सीआरपीएफला जाईल,” असं अमित शाह सीआरपीएफ जवानांना संबोधित करताना म्हणाले. शिवाय  गेल्या काही वर्षांत जम्मू-काश्मीरमधील एकूण सुरक्षा परिस्थितीत मोठी सुधारणा झाली आहे असं म्हणत त्यांनी कलम ३७० आणि ३५अ रद्द केल्यानं जम्मू-काश्मीरच्या लोकांना फायदा झालाय, असं सांगितलं.

Raj Thackeray Ankita walavalkar
“राज ठाकरेंनी महायुतीच्या सत्तेत सहभागी होण्यापेक्षा…”, कोकण हार्टेड गर्लची खास इच्छा; अमित शाहांबरोबरच्या भेटीवर म्हणाली…
Eknath Shindes Shiv Senas claim on Bhiwandi Lok Sabha
भिवंडी लोकसभेवर शिंदेच्या शिवसेनेचा दावा, कल्याणचे पडसाद भिवंडीत
heavy traffic in patri pool area in kalyan
कल्याण : पत्रीपुलामुळे पुन्हा मनस्ताप, आता रस्ते कामामुळे अभूतपूर्व वाहतूक कोंडी
Narendra Modi at rbi event
“मी पुढचे १०० दिवस व्यस्त, मात्र शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी…”, रिझर्व्ह बँकेला पंतप्रधान मोदींचं मोठं आश्वासन

कार्यक्रमादरम्यान, दहशतवाद आणि देशभरातील बंडखोर यांच्याशी लढताना प्राण गमावलेल्या सीआरपीएफ जवानांच्या नातेवाईकांना शाह यांच्या हस्ते पदके आणि पुरस्कार प्रदान करण्यात आले.