नवी दिल्ली : भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या लशीची परिणामकारकता वाढवणारा औषधी घटक तयार करण्यासाठी वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी या संस्थेने मदत केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सीएसआयआरने दिलेल्या माहितीनुसार, कोव्हॅक्सिन ही लस अलगेल आयएमडीजी या घटकासमवेत तयार केली असून हा घटक टीएलआर ७-८ अ‍ॅल्युमिनियम हायड्रॉक्साइडच्या जेलच्या माध्यमातून लशीत मिसळला जातो. त्यामुळे लशीची परिणामकारकता वाढते. टीएलआर ७-८ हा घटक लशीची परिणामकारकता वाढवतो. सीएसआयआरच्या आयआयसीटी या हैदराबादच्या प्रयोगशाळेने त्यासाठी मदत केली आहे. या कृत्रिम मार्गाचा अवलंब करण्यासाठी भारत बायोटेकने या संस्थेची मदत मागितली होती. या रेणूमुळे लशीची परिणामकारकता वाढवण्यास मदत होते.  आयआयसीटीचे संचालक चंद्रशेखर व वरिष्ठ वैज्ञानिक राजी रेड्डी यांनी चार महिन्यात हा रेणू तयार केला. सीएसआयआरच्या आयआयसीटी चमूचे नेतृत्व मोहना कृष्णा मुदीयम यांनी केले. आयआयसीटीने आम्हाला हा रेणू कमी काळात तयार करून दिला हे त्यांचे मोठे यश आहे, असे भारत बायोटेकचे व्यवस्थापैकीय संचालक कृष्णा इल्ला यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Csir helps in the preparation of components of covacin vaccine akp
First published on: 28-02-2021 at 02:54 IST