Cyclone Biparjoy Gujarat Updates : बिपरॉय जॉय चक्रीवादळ गुजरात किनाऱ्याला धडकलं आहे. ताशी १३० किमीच्या वेगाने वारे वाहात आहेत. तसंच पाऊसही सुरु झाला आहे. भारत सरकारतर्फे नुकसान रोखण्यासाठी शक्य तेवढे सगळे प्रयत्न सुरु आहे. भारतीय लष्कर, एनडीआरएफसह सर्व यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारचे मंत्रीही या वादळावर लक्ष ठेवून आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी तेलंगणचा दौरा रद्द केला आहे.

चक्रीवादळाविषयी महत्त्वाच्या अपडेट्स

चक्रीवादळ बिपरजॉय गुजरातच्या किनाऱ्याला धडकलं. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सौराष्ट्र, कच्छ आणि जखाऊ बंदरांना धडकून नंतर पाकिस्तानच्या दिशेने जाईल. हवामान विभागाने हा दावा केला आहे की ही प्रक्रिया चार तास चालणार आहे.

IMD चे महासंचालक डॉ. मृत्यूंजय महापात्र यांनी सांगितलं की सध्या ११५ ते १२५ किमी. प्रतितास वेगाने वारे वाहात आहेत. सौराष्ट आणि कच्छ या ठिकाणी मुसळधार पाऊस आहेत. मध्यरात्रीपर्यंत हे वादळ धडकण्याची प्रक्रिया सुरु राहणार आहे.

हे पण वाचा- Cyclone Biparjoy चं रिपोर्टिंग करताना पाकिस्तानच्या ‘चांद नवाब’ची पुराच्या पाण्यात उडी, Video पाहून पोट धरून हसाल

हवामान विभागाने लोकांना सतर्क राहण्यास सांगितलं आहे. मुसळधार पाऊस आणि तुफानी वारे वाहतील. काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा- Biparjoy Cyclone चं काळजात धडकी भरवणारं दृश्य; अंतराळवीरानं अवकाशातून टिपली छायाचित्रं!

गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी जी तयारी झाली आहे त्याचा आढावा घेतला. आत्तापर्यंत कच्छ, जामनगर, मोरबी, राजकोट, देवभूमि द्वारका, जुनागढ, पोरबंदर आणि गिर सोमनाथ येथील किनारपट्टीच्या भागातून एक लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मदत आणि बचावकार्यासाठी NDRF आणि SDRF यांच्यासह वायुसेना, नौदल आणि सीमा सुरक्षा दलाचे जवानही तैनात झाले आहेत. लष्कराने भुज, जामनगर, गांधीधाम यासह मांडवीतल्या महत्त्वाच्या ठिकाणी २७ तुकड्या तैनात करण्यात आली आहे. तर अहमदाबाद, वडोदरा आणि दिल्ली या ठिकाणी वायुसेनेने हेलिकॉप्टर तैनात केलं आहे. नौदलाने बचावासाठी ओखा, पोरबंदर या ठिकाणी १० ते १५ टीम्स तैनात केल्या आहेत.