दाऊदने सौदी अरेबियात दिला राग! दोन भारतीयांकडून उकळले १० कोटी

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीला फोनवरुन धमकावल्याशिवाय खंडणी उकळण्याचा नवा मार्ग सापडला आहे. कन्सस्ट्रक्शन व्यवसायाशी संबंधित असलेले हे दोघेजण उमराह तीर्थयात्रेसाठी सौदी अरेबियाला गेले होते.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीला फोनवरुन धमकावल्याशिवाय खंडणी उकळण्याचा नवा मार्ग सापडला आहे. अलीकडेच डी कंपनीने सौदी अरेबियात गेलेल्या गुजरातमधील दोघा व्यावसायिकांना धमकावून त्यांच्याकडून तब्बल १० कोटी रुपयांची खंडणी उकळली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कन्सस्ट्रक्शन व्यवसायाशी संबंधित असलेले हे दोघेजण उमराह तीर्थयात्रेसाठी सौदी अरेबियाला गेले होते.

दाऊदच्या तावडीतून निसटून सुखरुप भारतात परतण्यासाठी त्यांनी १० कोटी रुपये मोजले. या दोघांनी दाऊदला इतकी मोठी रक्कम कशी उपलब्ध करुन दिली ? त्यासाठी कुठला मार्ग निवडला ? त्याचा शोध सुरक्षा यंत्रणा घेत आहेत. गुजरातच्या वालेड शहरात दोघांचाही कन्सस्ट्रक्शनचा मोठा व्यवसाय आहे. जीवाच्या भितीने दोघांनीही पोलिसात तक्रार दाखल न केल्यामुळे आरोपींचा माग काढणे पोलिसांसाठी कठिण होऊन बसले आहे.

दाऊदच्या या नेटवर्कपर्यंत पोहोचण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी गुप्त मार्गाने तपास सुरु केला आहे. हे दोघेही व्यावसायिक आपल्या ग्रुपसह उमराह तीर्थयात्रेसाठी गेले होते. यूएईमधील वास्तव्या दरम्यान डी गँगच्या माणसांनी त्यांच्याशी संपर्क साधला व भारतात सुखरुप जाण्यासाठी प्रोटेक्शन मनी म्हणून त्यांच्याकडे प्रत्येक पाच कोटी रुपयांची मागणी केली असे सूत्रांनी सांगितले.

पैसे पोहोचवण्यासाठी बेकायद हवाला नेटवर्कचा वापर केल्याची दाट शक्यता असून आम्ही गुप्तपणे याचा तपास करत आहोत असे गुजरात पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मागच्या काही काळापासून रिअल इस्टेट, व्यावसायिक आणि काही राजकारणी अंडरवर्ल्डच्या रडारवर आहेत. रवी पुजारी, दाऊदचा सहकारी अली बुदेश त्यांना फोनकरुन खंडणीसाठी धमकावत असतात. अली बुदेशने उत्तर प्रदेशातील काही आमदारांना खंडणीसाठी धमकावले होते. जून २०१८ मध्ये अहमदाबादमधील भाजपाचे माजी आमदार बिमल शहा यांनी अली बुदेशकडून खंडणीसाठी धमकीचा फोन आल्याचा आरोप केला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: D company extorts 10 crore from two businessman

ताज्या बातम्या