बेहिशेबी मालमत्तेप्रकरणीच्या खटल्यात वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी आणि आर्थिक सल्लागार व्ही विजय साई रेड्डी यांच्या न्यायालयीन कोठडीत २१ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्याच दिवशी पुढील सुनावणी होणार आहे.
तर जगनच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्या प्रकरणात राज्याच्या तत्कालीन गृहमंत्री पी सविता रेड्डी कोर्टात हजर झाल्या. या प्रकरणी सीबीआयने पाचवे आरोपपत्र दाखल केले असून त्यात सविता रेड्डी आणि इतर आरोपी न्यायालयात हजर झाले. न्यायालयात जगनच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. असे प्रकार झाले तर तुम्ही न्यायालयाची सहानुभूती गमवाल, असा इशारा न्यायमूर्तीनी दिला. व्यवस्थित वागा, असेही न्यायमूर्तीनी सुनावले. न्यायालयाच्या शेजारच्या कक्षात जगनना कुटुंबीयांना भेटण्यास एक तासाचा अवधी देण्यात आला.