अभिनेता सनी देओल, हन्स राज हन्स यांच्यानंतर प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. शुक्रवारी दलेर मेहंदीने हन्स राज हन्स आणि केंद्रीय मंत्री विजय गोयल यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. दिल्ली भाजपाचे प्रमुख मनोज तिवारी, क्रिकेटकडून राजकारणाच्या पीचकडे वळलेले गौतम गंभीर दलेर मेहंदी यांच्या पक्षप्रवेशाच्यावेळी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दलेर मेहंदींच्या मुलीचे हन्स राज हन्स यांच्या मुलाबरोबर लग्न झाले आहे. लोकसभा निवडणूक चौथ्या टप्प्यात पोहोचत असताना भाजपा जास्तीत जास्त स्टार, सेलिब्रिटींना पक्षामध्ये प्रवेश देत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता सनी देओलने केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमन, पियुष गोयल यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.

त्याचदिवशी भाजपाने त्यांना गुरदासपूरमधून उमेदवारी जाहीर केली. हन्स राज हन्स यांना उत्तर पश्चिम दिल्लीतून उमेदवारी दिली आहे. यापूर्वी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षाने त्यांना उत्तर मुंबईतून उमेदवारी दिली आहे.