सध्याच्या घडीला विविध प्रकारच्या नात्यांमध्ये नेमकं काय चाललं आहे असाच प्रश्न पडतो. सासरे आणि सून हे नातं वडील आणि मुलीच्या नात्याप्रमाणेच असतं. दरम्यान एक अशी घटना समोर आली आहे ज्यामुळे सासऱ्यांच्या मृत्यूचं गूढ उकललं आहे.

नेमकी घटना काय आणि कुठे घडली?

हरियाणातील यमुनानगर या ठिकाणी पाच दिवसांपूरवी ओमप्रकाश नावाच्या एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांचा मृतदेह सापडला. यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं. सगळ्या आवश्यक औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांना देण्यात आला. हा मृतदेह पाहून सून जोरजोरात टाहो फोडून रडू लागली. जोपर्यंत माझ्या सासऱ्यांच्या खुन्याला पकडणार नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असंही ती म्हणत होती. तसंच २५ दिवसांत आमच्या घरातल्या दुसऱ्या व्यक्तीची हत्या झाल्याचंही ती म्हणत होती. यानंतर पोलिसांना तिच्या जास्त रडण्याचा संशय आला. यानंतर पोलिसांनी तातडीने तिची चौकशी केली तेव्हा तिनेच सासरे ओमप्रकाश यांची हत्या घडवून आणल्याची माहिती समोर आली.

२० दिवसांपूर्वीची घटना काय?

ओमप्रकाश यांचा नातू याचाही मृत्यू वीस दिवसांपूर्वी झाला. त्याचा मृतदेह यमुना नदीच्या प्रवाहात आढळून आला होता. पोलिसांना आता ओमप्रकाश यांच्या सुनेवर या हत्या प्रकरणावरुनही संशय आहे. पोलिसांनी ओमप्रकाश यांच्या सुनेला ताब्यात घेतलं आहे आणि तिची दोन्ही हत्यांबाबत चौकशी सुरु आहे. ललिता असं या सुनेचं नाव आहे. सासऱ्यांची हत्या घडवून आणण्याच्या कटात ललिता सहभागी होती. ललिताने तिच्या प्रियकरासह मिळून सासऱ्यांची गळा चिरून हत्या केली. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे

पोलिसांनी ललिता आणि तिच्या प्रियकराला केली अटक

दरम्यान ओमप्रकाश यांच्या हत्या प्रकरणात ललिता आणि तिच्या बॉयफ्रेंडला पोलिसांनी अटक केली आहे. सुरुवातीला ललिताने चोराच्या उलट्या बोंबा या म्हणीप्रमाणे पोलिसांवरच आरोप केले. पोलीस काय तपास करत आहेत? याचे व्हिडीओ शुटिंग करा असंही ललिताने माध्यमांना सांगितलं. मात्र पोलिसांनी ओमप्रकाश यांच्या हत्येचं गूढ उकललं आहे. त्यामुळे आता ललिता आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. आता ललिताने कुठलाही आरोप केलेला नाही. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

सासरे ओमप्रकाश यांना का ठार केलं?

ललिता आणि तिच्या प्रियकराचे विवाहबाह्य संबंध होते. ओमप्रकाश यांना या नात्याची कल्पना आली होती. करतार म्हणजेच ललिताचा प्रियकर आहे. ललिताला हे वाटत होतं की आपल्याबाबत कुणाला समजता कामा नये. मात्र ओमप्रकाश यांना हे कळल्यामुळे त्यांची हत्या या दोघांनी केली. आता ओमप्रकाश यांच्या नातवाच्या हत्या प्रकरणात या दोघांची चौकशी सुरु आहे.