scorecardresearch

आधी ‘हनुमान’, नंतर ‘रावण’; नाटक सुरू असताना दोन दिवसात दोघांचा स्टेजवरच मृत्यू

उत्तर प्रदेशमधील फतेहपूर जिल्ह्यात ‘लंका दहन’ नाटकात हनूमान आणि रावण या भूमिका करणाऱ्या दोन व्यक्तींचा स्टेजवरच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.

आधी ‘हनुमान’, नंतर ‘रावण’; नाटक सुरू असताना दोन दिवसात दोघांचा स्टेजवरच मृत्यू
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

उत्तर प्रदेशमधील फतेहपूर जिल्ह्यात ‘लंका दहन’ नाटकात हनूमान आणि रावण या भूमिका करणाऱ्या दोन व्यक्तींचा स्टेजवरच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. हे दोन्ही कलाकार रामलिला नाटक सादर करत होते. आधी हनुमानाची भूमिका करणाऱ्या ५० वर्षीय कलाकाराचा शनिवारी (१ ऑक्टोबर) स्टेजवरच मृत्यू झाला. त्यानंतर लगेच एक दिवसात रविवारी (२ ऑक्टोबर) रावणाची भूमिका करणाऱ्या ६० वर्षीय कलाकाराचा नाटक करत असतानाच ह्रदय बंद पडून मृत्यू झाला. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

६० वर्षीय कलाकाराचं नाव पतीराम असं आहे. ते अयोध्येतील ऐहार गावात सीताहरणाचं सादरीकरण करत असतानाच त्यांच्या छातीत दुखू लागलं. त्यानंतर इतर कुणी मदत करण्याआधीच ते स्टेजवर कोसळले. यानंतर रामलिला समितीच्या सदस्यांनी तात्काळ नाटक थांबवलं आणि पतीराम यांना रुग्णालयात दाखल केलं. तेथे डॉक्टरांनी पतीराम यांचा आधीच मृत्यू झाल्याचं स्पष्ट केलं.

हेही वाचा : शेतात विवस्र आढळलेल्या मुलीचा मृतदेह घेऊन पोलिसांनी काढला पळ, ‘यूपी’तील घटनेचा धक्कादायक VIDEO

मागील अनेक वर्षांपासून पतीराम रावणाची भूमिका करत होते. त्यांच्यामागे त्यांची पत्नी देवमती, दोन मुलं आणि दोन मुली आहेत.

हनुमानाची भूमिका करणाऱ्या कलाकाराचा मृत्यू

विशेष म्हणजे एक दिवस आधीच याच नाटकात हनुमानाची भूमिका करणाऱ्या ५० वर्षीय कलाकाराचा लंका दहनाचे सादरीकरण करताना स्टेजवरच मृत्यू झाला. ही घटना फतेहपूर जिल्ह्यातील सालेमपूर येथे घडली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या