जिनिव्हा,:कोव्हॅक्सिन लशीला जागतिक आरोग्य संघटनेकडून (डब्ल्यूएचओ) मान्यता मिळवण्यासाठी भारत बायोटेकला आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. डब्ल्यूएचओच्या तांत्रिक सल्लागार गटाने या लशीबाबत भारत बायोटेककडे आणखी तपशाील मागवला आहे. कोव्हॅक्सिनच्या   आपत्कालीन वापरास मान्यता देण्याबाबत २४ तासांत निर्णय घेतला जाईल, असे डब्ल्यूएचओच्या प्रवक्त्याने मंगळवारी सांगितले होते त्यामुळे लशीला लवकरच मान्यता मिळेल अशी अपेक्षा होती. कोटय़वधी भारतीयांनी कोव्हॅक्सिन लशीची मात्रा घेतली आहे. परंतु या लशीला  डब्ल्यूएचओची मान्यता नसल्याने अनेकांचा परदेश प्रवास रखडला आहे. आता त्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.