केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळच्या (सीबीएसई) १२ वीच्या परीक्षेचा निकाल गुरूवारी जाहीर झाला. दरवर्षीप्रमाणेच यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली. मात्र, दिल्लीमधील एका मुलीनं सलग तिसऱ्यांदा नापास झाल्यामुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
निकालाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी दिल्लीमधील एका १७ वर्षीय मुलीने सलग तिसऱ्यांदा नापास झाल्यामुळे गळफास घेत आपले जीवन संपवले. गुरूवारी सीबीएसई परिक्षेचा निकाल तिने पाहिला. आपण तिसऱ्यांदा नापास झाल्याचे समजल्यानंतर ती घरी परतली. घरी परतल्यानंतर आई-वडिलांसोबत जेवन केलं. आणि त्यानंतर आपल्या खोलीत जाऊन गळफास घेत तिने जीवनयात्रा संपवली.
नापास झाल्यामुळे मुलीने आत्महत्या केल्याची शक्यता तिच्या वडिलांनी फेटाळळी असून आत्महत्येचं नेमकं कारण शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत असे मुलीच्या वडिलांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले. पुढे ते म्हणाले की, आम्हाला ऐवढं सीबीएसईच्या कार्यालयातून बाहेर आल्यानंतर तिने पेपर कॅन्सल झाल्याचे आईला फोन करून सांगितले होते. त्यामुळे ती पुन्हा एकदा नापास होणार याबाबत कल्पना होती. पण ती आम्हाला सांगायला घाबरत होती. तिने आत्महत्या का केली हे आम्हाला माहित नाही.
२०१७ मध्ये सीबीएसईमध्ये मुलगी नापास झाली होती. आणि २०१८ मध्ये तिने पुन्हा एकदा परिक्षा दिली. यावेळी तिला स्पेशल कम्पार्टमेंट मिळाले होते. गेल्या वर्षी शाळेतून बडतर्फ केलं होते. यंदा तिने पुन्हा एकदा कम्पार्टमेंटमध्ये परिक्षा दिली होती.