भाजपा नेते विजेंद्र गुप्ता यांनी मंगळवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या विरोधात मानहीनीचा खटला दाखल केला आहे. गुप्ता यांच्यावर आम आदमी पार्टी प्रमुख केजरीवाल यांच्या हत्येचा कट रचणा-यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला होता. यावर विजेंद्र गुप्ता यांनी आपली प्रतिमा मलीन करण्याचे हे षडयंत्र आहे, असे सांगत या दोघांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. न्यायालय ६ जून रोजी याप्रकरणी सुनावणी करणार आहे.

https://twitter.com/ANI/status/1135818293443321856

विजेंद्र गुप्ता यांनी मुख्यमंत्री केजरीवाल व सिसोदिया यांना एक आठवडा अगोदर कायदेशीर नोटीस पाठवत याप्रकरणी माफी मागावी,असे म्हटले होते. मात्र याचे काहीच उत्तर न आल्याने आता आपण या दोघांविरोधात पटियाला हाउस न्यायालयात खटला दाखल केला असल्याचे गुप्ता यांनी सांगितले आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोघांविरोधात पोलीसात तक्रारही दाखल केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.