लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेल करणाऱ्या शिक्षिकाची अल्पवयीन विद्यार्थ्यानेच हत्या केली असल्याची घटना दिल्लीतून समोर आली आहे. या प्रकरणी विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आलं असून त्याची चौकशी सुरू आहे.

दिल्लीतील जमिआ नगर परिसरात ही घटना घडली आहे. २८ वर्षीय खासगी शिकवणी घेणारा शिक्षक वसिम अल्पवयीन मुलावर सातत्याने लैंगिक अत्याचार करत होता. तसंच, त्याने या मुलाचे व्हिडीओही काढले होते, असं दिल्ली पोलिसांनी सांगितलं. हे व्हिडीओ दाखवून शिक्षक मुलाला ब्लॅकमेल करत असल्याचंही पोलिसांनी पुढे स्पष्ट केलं.

हेही वाचा >> “भारत हिंदूंचा देश, तुम्ही पाकिस्तानात…”, कर्नाटकातील शिक्षिकेचे मुस्लीम विद्यार्थ्यांना आक्षेपार्ह वक्तव्य

३० ऑगस्ट रोजी पोलिसांना वसिमचा मृतदेह सापडला. त्याच्या मानेवर तीव्र खुणा होत्या. वसिमच्या वडिलांच्या घराजवळ त्याचा मृतदेह सापडला आहे. अल्पवयीन मुलगा झकिर नगर येथे राहतो. दरम्यान, याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर हत्येचा तपास केल्यानंतर अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आलं.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसिमने मुलावर अनेकवेळा लैंगिक अत्याचार केले होते. त्याने व्हिडीओ बनवले होते. हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही त्याने दिली होती. ३० ऑगस्ट रोजी वसिमने मुलाला सकाळी साडेअकरा वाजता लैंगिक संबंधांसाठी फोन केला होता. परंतु, अल्पवयीन मुलगा त्याच्या त्रासाला कंटाळला होता. त्यामुळे त्याने वसिमची धारदार पेपर कटरने हत्या केली. वसीमचा मोबाईल फोन, हत्येवेळी मुलाने घातलेले कपडे आणि शूजही पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केले आहेत.

हेही वाचा >> VIDEO : सनातन धर्माबद्दल उदयनिधी स्टॅलिन यांचं वादग्रस्त विधान; काँग्रेस नेते आचार्य प्रमोद फटकारत म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत हत्येचे प्रकार वाढले आहेत. गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याने दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.