Delhi Court On Ward Haram : दिल्ली न्यायालयाने ‘हराम’ या शब्दाबद्दल एक महत्त्वाची टीप्पणी केली आहे. न्यायालयाने म्हटले की ‘हराम’ शब्दाचा अर्थ हा असे काहीतरी असे जे वाईट किंवा चुकीच्या मार्गाने कमावलेले असेल आणि हा शब्द कोणत्याही कष्ट करणाऱ्या महिलेच्या प्रतिष्ठेचा अपमान करतो.

तीस हजारी न्यायालयाचे जेएमएफसी करणबीर सिंह म्हणाले की, ‘हराम’हा शब्द केवळ असा शब्द नाही की ज्याचा वापर फक्त एखाद्या व्यक्तीचा अपमान करण्यासाठी केला जातो. ‘हराम’ शब्दाचा अर्थ असे काहीतरी जे निषिद्ध आहे. चुकीच्या पद्धतीने किंवा अत्यंत वाईट मार्गाने मिळवलेले आहे. हा शब्द कोणत्याही मेहनत करणाऱ्या महिलेच्या प्रतिष्ठेचा अवमान करेल.

न्यायालयाने भारतीय न्याय संहिता, १८६० (आयपीसी)चे कलम ५०९ अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात व्यक्तीला दोषी ठरवताना ही टिप्पणी केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

या व्यक्तीवर “हराम का माल लेकर आ गई है, कितने से करवा आई है” असे शब्द वापरून महिलेच्या प्रतिष्ठेचा अपमान केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.

दरम्यान या आरोपावर बचाव पक्षाने युक्तीवाद केला होता की सरकारी पक्षाने कोणत्याही प्रत्यक्षदर्शींची चौकशी केली नाही आणि फक्त तक्रारदारानेच आरोपीने हे शब्द उच्चारल्याचे म्हटले होते. मात्र हा युक्तीवाद फेटाळात न्यायमूर्ती म्हणाले की, या युक्तीवादात कोणताही दम नाही, तक्रारकर्त्याचा जबाब स्पष्ट, ठोस, विश्वासार्ह आहे. तसेच CrPCच्या कलम १६४ अंतर्गत दिलेल्या जबाबापासून ती विचलित झाली नाही.

न्यायालयाने म्हटले की ‘हराम’ शब्द एका महिलेच्या प्रतिष्ठेचा अपमान करतो कारण यातून संबंधित महिला प्रामाणिक नाही असे दाखवले जाते.

यामध्ये म्हटले आहे की “कितने से करवा के आई” हे शब्द म्हणजे फक्त अपमान नाही, तर थेट पद्धतीने महिलेच्या जेंडरवरती केलेला प्रहार आहे. याबरोबरच यातून दिसून येते की या शब्दांचा अर्थ महिला व्यभिचारी आहे आणि तिच्या चारित्र्यावर आक्षेप घेणारा होतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न्यायालयाने म्हटले की, “हा कोणत्याही महिलेच्या प्रतिष्ठेचा अपमान करणारा आहे. या शब्दांचा हा देखील अर्थ होतो की ती अनेक लोकांबरोबर शरीरसंबंध ठेवते. त्यामुळे न्यायालयाचे मत आहे की आरोपीद्वारे उच्चारलेल्या शब्दांचा उद्देश हा तक्रारकर्त्याच्या प्रतिष्ठेचा अपमान करण्याचा आहे.