संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ) निर्मनुष्य हवाई वाहन (यूएव्ही) तयार करीत असून त्याचा उपयोग सैन्याला टेहळणीसाठी होणार आहे. या छोटया विमानाचे वजन ३०० ग्रॅम असेल व लांबी ३०० मिलीमीटर असेल. त्यात दिवसाच्या उजेडात चालू शकेल असा टीव्ही कॅमेरा बसवला जाणार आहे. त्याचा वेग ताशी ३७ कि.मी असेल. साधारण ३० ते १०० मीटर उंचीवरून ते प्रवास करू शकेल. सैन्याला साधारण दोन कि.मी त्रिज्येच्या परिसरात काय घडामोडी होत आहेत याची माहिती या विमानामुळे मिळेल. दहशतवादाचा व ईशान्येकडील बंडखोरींचा मुकाबला करण्यासाठी त्यांचा वापर करता येईल. यापूर्वी संरक्षण संशोधन व विकास संस्थेने दीड किलो वजनाचे विमान तयार केले होते. त्याचे नाव ‘नेत्र’ असे आहे, पुण्याच्या एरियल रीसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट या संस्थेने ते तयार केले होते. याच संस्थेच्या माध्यमातून संरक्षण संशोधन व विकास संस्था आणखी चांगली छोटी विमाने तयार करीत आहे. आणखी विस्तृत प्रदेशात टेहळणी करणारी विमाने एआरडीइ तयार करणार आहे.मध्यम उंचीवरून जाणारे व दणकट असलेले रूस्तन हे निर्मनुष्य लढाऊ विमान (यूसीएव्ही) ही संस्था तीनही सेनादलांसाठी तयार करीत आहे. निर्मनुष्य हवाई वाहन, ‘निशांत’ शत्रू प्रदेशातील गुप्तचर माहिती मिळवण्यासाठी वापरले जाणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 25th Mar 2013 रोजी प्रकाशित
शत्रू प्रदेशात टेहळणीसाठी डीआरडीओ नाजूक विमान बनवणार
संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ) निर्मनुष्य हवाई वाहन (यूएव्ही) तयार करीत असून त्याचा उपयोग सैन्याला टेहळणीसाठी होणार आहे. या छोटया विमानाचे वजन ३०० ग्रॅम असेल व लांबी ३०० मिलीमीटर असेल. त्यात दिवसाच्या उजेडात चालू शकेल असा टीव्ही कॅमेरा बसवला जाणार आहे.
First published on: 25-03-2013 at 02:28 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delicate plane for reconnaissance by drdo