राजस्थानच्या जैसलमेरमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासमोर काही भाविकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ नारे लगावल्याचे समोर आले आहे. जैसलमेरमधील रामदेवरा मंदिरामध्ये मुख्यमंत्र्यांच्या भेटीदरम्यान ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि राजस्थानचे भाजपा प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांच्यासह काही नेत्यांनी शेअर केला आहे. गेहलोत यांनी मंदिरात प्रवेश करताच काही भाविकांनी ‘अशोक गेहलोत जिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या होत्या. या घोषणांच्या प्रत्युत्तरात काही इतर भाविकांनी नंतर ‘मोदी-मोदी’च्या घोषणा दिल्या, अशी माहिती सूत्रांनी ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेला दिली आहे.

व्हिआयपी व्यक्तींसाठी असलेल्या प्रवेशद्वारातून गेहलोत मंदिरात दाखल झाले होते. त्यानंतर समाधी परिसराच्या दिशेने ते चालत असताना काही भाविकांनी गेहलोत यांना उद्देशून ‘मोदी-मोदी’ अशा घोषणा दिल्या. या घोषणा खिलाडीवृत्तीने घेत गेहलोत यांनी भक्तांकडे हात उंचावला.

गणपती दर्शनासाठी CM शिंदे नारायण राणेंच्या घरी; दर्शनानंतर भेटीदरम्याच्या चर्चेबद्दल बोलताना म्हणाले, “बाळासाहेबांच्या…”

“आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ घोषणा देऊन काही भाविकांनी रामदेवरा मंदिरात गहलोत यांचे स्वागत केले. या घोषणांद्वारे भाविकांनी आपली निवड स्पष्ट केली”, असे ट्वीट शेखावत यांनी केले आहे.  

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘मोदी-मोदी’ या घोषणांनी गेहलोत यांचे करण्यात आलेले स्वागत आगामी २०२३ आणि २०२४ मधील निवडणुकांचा कल स्पष्ट करतात, असे सतीश पुनिया म्हणाले आहेत. पुढील वर्षी राजस्थानमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुनिया यांनी हे वक्तव्य केले आहे.