Dhirendra Shastri : बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. मंदिर असो की मशिद दोन्ही धर्मस्थळांमध्ये आरती, नमा यानंतर वंदे मातरम गायलं गेलं पाहिजे. यामुळे देशभक्त कोण आहेत आणि राष्ट्र विरोधी कोण? ते लक्षात येईल असं धीरेंद्र शास्त्रींनी (Dhirendra Shastri ) म्हटलं आहे.

काय म्हणाले धीरेंद्र शास्त्री?

“मंदिर असो किंवा मशिद असो, दोन्ही धर्मस्थळांवर वंदे मातरम म्हटलं गेलं पाहिजे. जर हा नियम लागू केला तर देशभक्त कोण आहे आणि राष्ट्रविरोधी कोण? ही बाब स्पष्ट होईल.” असं बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र शास्त्रींनी ( Dhirendra Shastri ) म्हटलं आहे. या वक्तव्यावरुन वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत. मात्र हे वक्तव्य चर्चेतही आलं आहे. धीरेंद्र शास्त्री ( Dhirendra Shastri ) पुढे म्हणाले, “सगळ्या समुदायांना देशात समान स्थान आहे, तसंच त्यांचा योग्य सन्मान केला जातो. मात्र वंदे मातरम म्हणण्याची प्रथा सुरु करण्यात आली की लोकांमध्ये देशभक्ती आपोआपच रुजली जाईल. तसंच कोण देशभक्त आहे आणि कोण राष्ट्रद्रोही आहे? हेदेखील समजेल. अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला तर राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने उचलण्यात आलेलं ते पाऊल असेल. लोकांमधल्या धार्मिक बाधा दूर होतील आणि एकमेकांमध्ये बंधूभाव वाढेल असंही धीरेंद्र शास्त्री ( Dhirendra Shastri ) यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- Video: संजय दत्त पोहोचला बागेश्वर धामला, बालाजीचं दर्शन करून धीरेंद्र शास्त्रींचे घेतले आशीर्वाद, म्हणाला, “माझ्यासाठी आयुष्यातील…”

सनातन एकता पदयात्रेबाबत काय म्हणाले धीरेंद्र शास्त्री?

सनातन एकता पदयात्रेबाबत धीरेंद्र शास्त्री म्हणाले, या यात्रेचं आयोजन हिंदूंमध्ये एकता आणि एकात्म भाव निर्माण करणं हा आहे. हिंदूंनी जातीभेद विसरुन एक झालं पाहिजे. हिंदूंमध्ये हिंदू असल्याची भावना वाढली आहे आणि ही बाब चांगली आहे. सध्याचं वातावरण हे हिंदू एकतेचं आणि एकात्मतेचं आहे असंही बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आदिवासी नाही तर अनादिवासी आहेत

धीरेंद्र शास्त्री ( Dhirendra Shastri ) म्हणाले आदिवासी हा शब्द मला मान्य नाही. ते अनादिवासी आहेत. या सगळ्यांना अनादिवासी म्हटलं गेलं पाहिजे असा प्रस्ताव मी ठेवतो कारण हे सगळेजण प्रभू रामचंद्रांसह उभे होते. तसंच हे अनादिवासी शबरीचे वंशज आहेत त्यांचा योग्य सन्मान झाला पाहिजे असंही बागेश्वर धाम सरकार यांनी म्हटलं आहे.