पंतप्रधानपदाची स्वप्ने बघत नसल्याच्या गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा शुक्रवारी कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी समाचार घेतला. ट्विटच्या माध्यमातून दिग्विजय सिंह यांनी मोदी यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यावरही निशाणा साधलाय.
२०१७ पर्यंत गुजरातमध्येच! मोदींची स्पष्टोक्ती
पंतप्रधानपदाचे स्वप्न बघणाऱयांच्या पदरी कायम निराशा येते. कायम पंतप्रधानपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या अडवाणी यांच्याकडूनच मोदी यांना हा धडा घेतलाय का, असा प्रश्न दिग्विजय सिंह यांनी ट्विटरवर मोदी यांना विचारला. मोदी हुशार झाल्याचा टोमणाही दिग्विजय सिंह यांनी आपल्या आणखी एका ट्विटमधून मारला.
नेतृत्वाचा वाद महाग पडेल !
गांधीनगरमध्ये शिक्षकदिनानिमित्त गुरुवारी झालेल्या एका कार्यक्रमात मी पंतप्रधानपदाचे स्वप्न बघत नसल्याच्या आशयाचे वक्तव्य मोदी यांनी केले होते. जे लोकं काहीतरी बनण्याचे स्वप्न पाहतात. त्यांचे वाटोळे होते. काहीतरी बनण्याचे स्वप्न पाहण्यापेक्षा प्रत्येकाने काहीतरी करून दाखवण्याचे स्वप्न पाहिले पाहिजे, असे मोदी यांनी त्यांना विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटले. त्याचबरोबर आपण २०१७ पर्यंत गुजरातच्या जनतेचीच सेवा करू, असेही मोदी यांनी यावेळी म्हटले होते. त्यांच्या याच वक्तव्याचा दिग्विजय सिंह यांनी समाचार घेतला.