Donald Trump on iPhone Apple Manufacturing: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोहा येथे एक मोठे विधान केले असून, त्यांनी अॅपल कंपनीला भारतात आयफोन न बनवण्याचे आवाहन केले आहे. ट्रम्प यांनी अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांना सांगितले की, भारताला स्वतःचे हितसंबंध सांभाळू द्या. भारताने अमेरिकन वस्तूंवर शून्य कर आकारण्याचा प्रस्ताव दिला आहे. अॅपल भारतात आपली उत्पादन क्षमता वाढवण्याची योजना आखत असताना डोनाल्ड ट्रम्प यांचे हे विधान आले आहे.
आम्ही तुमच्याशी खूप चांगले वागतोय, पण…
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “मी काल टिम कुक यांच्याशी बोललो. मी त्यांना म्हणालो, टिम, आम्ही तुमच्याशी खूप चांगले वागतोय. तुम्ही ५०० अब्ज डॉलर्सची कंपनी बांधत आहात, पण आता मी ऐकत आहे की तुम्ही भारतात कारखाने बांधत आहात. मला असे वाटते की भारतात कारखाने उभारावे. जर तुम्हाला भारताला मदत करायची असेल तर ते ठीक आहे, पण भारत हा जगातील सर्वात जास्त कर आकारणाऱ्या देशांपैकी एक आहे. तिथे विक्री करणे कठीण आहे. भारताने आम्हाला एक प्रस्ताव दिला आहे ज्यामध्ये त्यांनी आपल्या वस्तूंवर कोणताही कर लादणार नाही असे आश्वासन दिले आहे.”
…आम्ही वर्षानुवर्षे सहन केले
अमेरिकेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले, “तुम्ही आधी चीनमध्ये कारखाने बांधले आहेत, ते आम्ही वर्षानुवर्षे सहन केले. आता आम्हाला तुम्ही भारतात कारखाने बाधावेत असे वाटत नाही. भारत स्वतःची काळजी घेऊ शकतो. ते खूप चांगले काम करत आहेत. आम्हाला तुम्ही अमेरिकेत कारखाने उभारावेत असे वाटते.” ट्रम्प यांच्या मते, अॅपल आता अमेरिकेत ५०० अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीसह उत्पादन वाढवेल.
‘अमेरिका फर्स्ट’ धोरणाचे प्रतिबिंब
डोनाल्ड ट्रम्प यांचे हे विधान त्यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणाचे प्रतिबिंब आहे. त्यांना अॅपल सारख्या मोठ्या ब्रँडनी अमेरिकेत गुंतवणूक करावी असे वाटत आहे, जेणेकरून अमेरिकत नोकऱ्या वाढतील. भारतात, अॅपल आधीच फॉक्सकॉन आणि टाटा यांच्या सहकार्याने आयफोनचे उत्पादन करत आहे. २०२५ मध्ये भारतात बनवले जाणारे १५% आयफोन अमेरिकेत निर्यात केले जातील. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचे हे विधान भारताच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमासाठी आव्हान ठरू शकते.