scorecardresearch

दोषारोपानंतरही ट्रम्प अध्यक्षपदाच्या शर्यतीत ; एका दिवसात ४० लाख डॉलर निधीची उभारणी 

ट्रम्प यांनी २०२४ च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ४० लाख डॉलरपेक्षा जास्त निधी उभारला.

Donald Trump indictment,
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (संग्रहित छायाचित्र) file photo

वॉशिंग्टन : एका पॉर्नस्टारला लाच दिल्याप्रकरणी दोषी आढळल्यानंतरही, अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीच्या शर्यतीतून माघार घेतलेली नाही. मॅनहॅटन ग्रँड ज्युरीने दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर २४ तासांच्या आत ट्रम्प यांनी २०२४ च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ४० लाख डॉलरपेक्षा जास्त निधी उभारला. त्यांच्या कार्यालयाने ही माहिती दिली.

हा निधी अमेरिकेतील सर्व ५० राज्यांमधून मिळाला असून, यापैकी २५ टक्क्यांपेक्षा जास्त देणगी ही पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुणांकडून मिळाली आहे. देणगीदारांची संख्या मोठी असून, प्रत्येक देणगीदाराने सरासरी ३४ डॉलर इतकी रक्कम दिली आहे. यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिक पक्षातर्फे उमेदवारी मिळवण्यासाठी ट्रम्प यांना बरीच पसंती असल्याचे दिसते. 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 02:25 IST

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या