मी देवाने आतापर्यंत जन्माला घातलेला सर्वात मोठा रोजगार निर्माता बनेन, असे अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर पहिल्याच पत्रकारपरिषदेत बोलताना त्यांनी हा दावा केला. माझ्या कार्यकाळात अधिक नोकऱ्यांच्या संधी निर्माण होतील यासाठी प्रयत्न करेन, असे त्यांनी सांगितले. यावेळी ट्रम्प यांनी सुरक्षा यंत्रणांकडून फुटलेल्या माहितीच्याआधारे त्यांच्यावर करण्यात येत असलेले सर्व आरोप फेटाळून लावले. आपण हँकिंगबद्दल बोलत असू तर ते वाईट आहे आणि ते करता कामा नये. यावेळी ट्रम्प यांनी त्यांच्या रशियाशी असलेल्या संबंधाबाबतची कागदपत्रे खोटी असल्याचा दावा केला. काही विकृत लोक जाणूनबुजून अशाप्रकारचे गैरसमज पसरवत असल्याचे त्यांनी म्हटले. हा माझ्या कारकीर्दीवरील सर्वात मोठा कलंक ठरेल. मला आशा आहे की, पुतीन यांच्याबरोबर माझे चांगले संबंध राहतील. पुतीन यांना मी आवडत असेल, तर ती जमेची बाब आहे. माझे रशियासोबत कोणतेही व्यवहार नाहीत, हे मी ट्विट करून सांगितले होते. मी रशियाकडून कोणतेही कर्जही घेतलेले नाही. माझ्यावर फार थोडे कर्ज असले तरी ती बाब मान्य करायला मला शरम वाटत नसल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर ट्रम्प यांनी पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Donald trump press conference live updates will be the greatest job producer god ever created
First published on: 11-01-2017 at 22:53 IST