पीटीआय, वॉशिंग्टन

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी रिपब्लिकन पक्षांतर्गत निवडणूक ‘न्यू हॅम्पशायर रिपब्लिकन प्रायमरी’मध्ये भारतीय वंशाच्या अमेरिकन निक्की हेली यांचा पराभव केला. ट्रम्प यांनी रिपब्लिकन पक्षाकडून आपल्या उमेदवारी निश्चितीच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी ५ नोव्हेंबरच्या निवडणुकीत जो बायडेन यांच्याशी ट्रम्प यांची पुन्हा संभाव्य अंतिम लढत होण्याची चिन्हे आहेत.

kamala harris get support of 1976 delegates from the democratic party
कमला हॅरिस यांचे आवश्यक संख्याबळ पूर्ण; डेमोक्रेटिक पक्षातील १,९७६ प्रतिनिधींचा पाठिंबा
Kash Patel influential role in US govt if Trump returns to White House
ट्रम्प जिंकले तर नव्या अमेरिकन सरकारमध्ये ‘हा’ भारतीय निभावू शकतो महत्त्वाची भूमिका!
kamala harris america presidential election
अमेरिकन नागरिक कृष्णवर्णीय महिलेला राष्ट्राध्यक्षपदी निवडून देणार का? इतिहास काय सांगतो?
Former President Donald Trump announced his candidacy at the Republican Party convention for the US presidential election
अधिवेशनात जंगी स्वागत, ट्रम्प यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; व्हान्स उपाध्यक्षपदाचे उमेदवार
jd vance india connection
डोनाल्ड ट्रम्प यांचे कडवे टीकाकार जेडी व्हॅन्स अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाचे दावेदार; काय आहे भारताशी कनेक्शन?
Bullet Inches From Donald Trump's Head
Donald Trump Shooting : ‘ती’ गोळी ट्रम्प यांच्या डोक्याजवळून गेली; नव्या फोटोमुळं खळबळ
Donald Trump Shooting, Donald Trump Rally shooting, Donald Trump injured during Pennsylvania rally , Trump, Donald Trump, Trump News, Trump Shot,Security Concerns donald trump, History of US President Assassinations and Attempts, US Presidential Assassinations and Attempts,
ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला… आतापर्यंत चार अमेरिकी अध्यक्षांच्या हत्या; तिघांच्या हत्येचा प्रयत्न!
Volodymyr Zelenskyy on Putin and modi meeting
पंतप्रधान नरेंद्र मोदी – पुतिन यांच्या भेटीवर युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची नाराजी; म्हणाले…

तीन चतुर्थाश मतांच्या मोजणीसह ट्रम्प ५५ ते ४४ टक्क्यांनी आघाडीवर आहेत. आतापर्यंत केवळ दोन राज्यांमध्ये अशा निवडणुकांचे मतदान झाले असले तरी, ट्रम्प यांच्या मंगळवारच्या प्राथमिक विजयाने रिपब्लिकन पक्षावरील त्यांचे वर्चस्व अधोरेखित केले. ट्रम्प यांनी गेल्या आठवडय़ात आयोवाच्या ‘कॉकस’मध्ये दणदणीत विजय मिळवला होता. ट्रम्प यांच्याविरुद्ध ९१ गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप आहेत. त्यात २०२० च्या अध्यक्षीय निवडणूक उधळून लावण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप आहे. असे असताना त्यांनी मिळवलेला हा विजय उल्लेखनीय आहे. परंतु दक्षिण कॅरोलिनाचे माजी प्रांतपाल आणि संयुक्त राष्ट्रातील राजदूत, ५२ वर्षीय हॅली यांनी मंगळवारी रात्री समर्थकांना एक धडाकेबाज भाषण देऊन लढण्याची शपथ घेतली. त्यांनी ट्रम्प यांच्या मानसिक तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि रिपब्लिकनांना इशारा दिला की ट्रम्प यांना अध्यक्षपदासाठी पुन्हा उमेदवारी दिल्यास पक्षाचा पराभव होईल.