भारतात गुजरातच्या सागरी भागात भारतीय तटरक्षक दलाने पाकिस्तानच्या मासेमारी बोटी स्फोटकांसह पकडल्याच्या वृत्ताचा पाकिस्तानने इन्कार केला आहे. परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते तनसीम अस्लम यांनी भारताने पाकिस्तानी बोटी पकडल्याचा स्पष्टपणे इन्कार केला आहे. ३१ डिसेंबर व १ जानेवारीमधील रात्री पोरबंदरपासून ३६५ कि.मी अंतरावार २००८ मधील मुंबई हल्ल्यात जसा बोटींच्या मदतीने हल्ला करण्यात आला होता तशाच उद्देशाने आलेल्या बोटी भारतीय तटरक्षक दलाने पकडल्या होत्या. तनसीम यांनी सांगितले की, कराचीमधील एकही बोट खुल्या क्षेत्रात
गेली नव्हती.
पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, ३१ डिसेंबरला पाकिस्तानच्या दोन रेंजर्सला मारल्याच्या घटनेवरून लक्ष उडवण्यासाठी भारताने बोटी पकडल्याचा दावा करण्यात आला आहे, पण तो खरा नाही. तो पाकिस्तानची प्रतिमा मलिन करण्याच्या प्रचार मोहिमेचा
भाग आहे.भारताच्या संरक्षण मंत्रालय प्रवक्त्याने सांगितले की, भारतीय तटरक्षक दलाने मासेमारी बोटीला कर्मचारी व सामानाच्या चौकशीसाठी थांबायला सांगितले होते पण बोटीने वेग वाढवून ती भारतीय सीमा ओलांडून परत पाकिस्तानकडे परत गेली.
‘त्या’ बोटी आमच्या नाहीत!
भारतात गुजरातच्या सागरी भागात भारतीय तटरक्षक दलाने पाकिस्तानच्या मासेमारी बोटी स्फोटकांसह पकडल्याच्या वृत्ताचा पाकिस्तानने इन्कार केला आहे.
First published on: 04-01-2015 at 08:43 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Doubts mount over indias claims of destroying error boat from pakistan