मणिपूरला आज दुपारी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ही ५.५ इतकी मोजली गेली. हवामान विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी १२ वाजून १८ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू मणिपूर-इम्फाळ सीमेवर होता. भूकंपाचा धक्क्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. धक्के जाणवताच घरातील सर्वांनी बाहेर पळ काढला.

भूकंपाच्या धक्कयात कोणतेही नुकसान झालेले नाही. राज्यात यापूर्वी ४ जानेवारी २०१६ मध्ये जोरदार भूकंपाचा धक्का बसला होता. यामध्ये ११ लोकांचा मृत्यू तर २०० हून अधिक लोक जखमी झाले होते.