एपी, दुबई : इराणमध्ये देशव्यापी निदर्शने सुरू असतानाच बुधवारी नागरिकांना अ‍ॅन्ड्रॉईड स्मार्ट फोनवर भूकंपाची सूचना देणारे खोटे संदेश पाठविण्यात आले. या प्रकाराबद्दल अधिकाऱ्यांनी परस्परविसंगत दावे केले आहेत. इराणच्या सायबर पोलीस विभागाचे उपप्रमुख कर्नल रामिन पाशाई यांनी इराणच्या सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीला सांगितले की, केवळ अ‍ॅन्ड्रॉईड स्मार्ट फोनवरच हे चुकीचे संदेश प्राप्त झाले. इराणच्या सरकारी सेवापुरवठादार इराण मोबाइल कम्युनिकेशन कंपनीकडून चाचणीदरम्यान चुकून हे संदेश लोकांपर्यंत पोहोचल्याचा दावा त्यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, इराणच्या इर्ना या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, हा हॅकिंगचा प्रकार होता. हे संदेश खोटे असून त्याला नागरिकांनी कोणताही प्रतिसाद देऊ नये, घराबाहेर पडू नये. त्यामुळे हा प्रकार नक्की कशामुळे घडला, हे अद्याप तरी ठामपणे सांगता येत नाही. अ‍ॅन्ड्रॉईड सॉफ्टवेअर पुरविणाऱ्या गुगलकडे याबाबत विचारणा केल्यानंतरही त्यांनी तातडीने प्रतिक्रिया दिली नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Earthquake protest hit iran inconsistent claims authorities nationwide protests in iran ysh
First published on: 08-12-2022 at 00:02 IST